शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात हत्तींचा धुडगूस; पिकांचे नुकसान

By admin | Updated: November 3, 2016 23:34 IST

बळिराजा धास्तावला : शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

 दोडामार्ग : गेले काही दिवस गायब असलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा तालुक्यातील हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून, भातपिकाची उडवी व कापणी केलेले भातपीक फस्त केले आहे. भातपिकाचा हंगाम ऐन बहरात आला असतानाच हत्ती पुन्हा दाखल झाल्याने बळिराजा धास्तावला आहे. संपूर्ण हेवाळे, बाबरवाडी, घाटवाडी, बांबर्डे येथील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाने भातपिकाबरोबरच केळी, सुपारी, माड, आदी बागायतींचे अतोनात नुकसान केले. वनखात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांचे सातत्याने लक्ष वेधूनही गेले वर्षभर हेवाळे-बाबरवाडी परिसरात नुकसान करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही. बांबर्डे व घाटवाडी येथील शेतकरी गोविंद बाबली गवस यांचे भात व केळी, विठ्ठल राणे यांची भात उडवी, अश्विनी आबासाहेब देसाई यांचे भात, वसंत सखाराम देसाई यांची केळी बागायत, विठ्ठल दत्ताराम देसाई यांच्या केळी व सुपारी बाग, भीमराव राणे यांचे केळी व भातपीक, सिद्धेश राणे यांच्या केळी बागायतीचे नुकसान केले आहे. चंदगड तालुक्यातून गेल गॅस पाईपलाईनसाठी काढलेल्या मार्गाने बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास दोन हत्ती खाली उतरले. त्यांनी बांबर्डे व घाटीवडे येथील शेतकऱ्यांचे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. बुधवारी रात्री दाखल झालेल्या हत्तींनी केलेले नुकसान पाहता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, वनपाल दत्ताराम देसाई यांनी वनरक्षक मुकाडे, लोकरे व वनमजूर देसाई यांच्यासमवेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे, तर रात्री आलेले हत्ती आल्या मार्गाने पुन्हा माघारी परतल्याचा दावा करण्यात आला. मात्र, खबरदारी म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आपली हत्ती प्रतिबंधक टीम बांबर्डे येथे ठेवणार असल्याची माहिती वनपाल देसाई यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)