शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांना ग्रामस्थांचा घेराओ

By admin | Updated: April 10, 2015 23:46 IST

इन्सुली येथील घटना : क्वॉरीवर कारवाईस नकार

बांदा : गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारणारे सावंतवाडीचे निवासी नायब तहसीलदार शशिकांत जाधव व बांदा मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांच्या विरोधात संतप्त ग्रामस्थ व डंपर व्यावसायिकांनी इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर घेराओ घालत नाराजी व्यक्त केली. वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा महसूलच्या आशीर्वादाने इन्सुली परिसरात सुरु असलेल्या बेकायेदशीर क्वॉरी बंद करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. मात्र, तहसिलदारांनी प्रथम अर्ज द्या नंतर कारवाई करतो असे सांगितल्याने व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी डंपर व्यावसायिक व नायब तहसिलदार शशिकांत जाधव, एम. आर. जाधव यांच्यात बाचाबाचीचे प्रकार घडलेत. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी पोलिस उपनिरिक्षक सुधाकर आरोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेळीच हस्तक्षेप केला. यावेळी महसूलच्या अधिकाऱ्यांचे क्वॉरी मालकांशी आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. महसूलच्या पथकाकडून जिल्ह्यातून गोव्यात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यासाठी महसूलकडून दिवसा व रात्र इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येते.शुक्रवारी सकाळी बांदा मंडळ अधिकारी एम. आर. जाधव, बांदा तलाठी एस. व्ही. नलावडे, डेगवे तलाठी किरण गझीनकर, असनिये तलाठी एस. बी. शिंदे यांचे पथक इन्सुली तपासणी नाक्यावर कार्यरत होते. जिल्ह्यातून गोव्याच्या दिशेने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर वाहतूक परवाना संपल्याचे कारण देत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, चालकांनी पैसे भरण्यास नकार दिला. वाहनांवर केलेली दंडात्मक कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे सांगत डंपर व्यावसायिकांनी मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांना घेराओ घालून जाब विचारला.आपण केवळ वाहनांवर कारवाई करता, बांदा मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कित्येक गावांत बेकायदा क्वॉरी सुरु असून या क्वॉरी मालकांशी मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यानेच त्यांचेवर कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप केला.यादरम्यान गोवा पासिंगच्या गाड्या न थांबविता जाऊ देण्यात आल्याने व्यावसायिकांनी आक्षेप घेतल्या. तसेच रात्रीच्या वेळी सुमारे १५0 वाळूच्या बेकायदा गाड्या गोव्यात पास करण्यात येतात, यामध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, तात्या वेंगुर्लेकर, संतोष धुरी, नीतेश पेडणेकर, साई राणे, गुंडु झांट्ये, सत्यवान कुडव, भाऊ नाटेकर यांचेसह डंपर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)व्यावसायिकांनी जाब विचारलासावंतवाडीचे नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी इन्सुली तपासणी नाक्यावर येत मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांच्याशी कारवाई संदर्भात चर्चा केली. त्यावेळी डंपर व्यावसायिकांनी इन्सुली, वेत्ये परिसरात सुरु असलेल्या बेकायदा क्वॉरी बंद करण्याची मागणी केली. आपण स्वत: बेकायदा सुरु असलेल्या क्वॉरी दाखवतो, आपण आमच्यासोबत चला. मात्र तहसीलदार जाधव यांनी आम्ही याठिकाणी केवळ बेकायदा वाहनांवर कारवाईसाठी आलो आहोत. आपण या क्वॉरींसदंर्भात सावंतवाडी कार्यालयात रितसर अर्ज द्या, नंतर कारवाईचे बघू, असे सांगितल्याने संतप्त व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत तहसीलदार यांना जाब विचारला.