शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: July 23, 2016 00:21 IST

पोलिस निरीक्षकांशी चर्चा : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

कणकवली : महामार्गावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तम पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्युला महामार्ग प्राधिकरण अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झाले होते. या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांंनी पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांची येथील पोलिस स्थानकात भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली.यावेळी सुदीप कांबळे, अंकुश कदम , गौतम खुडकर, किशोर राणे, विद्याधर तांबे, सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांची भेट घेतली. तसेच अपघातप्रकरणी स्वत: पोलिसांनी तक्रार दाखल करावी आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली. तसेच असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.दरम्यान, या अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन पोलिस निरीक्षकांनी यावेळी उपस्थितांना दिले. त्यामुळे आक्रमक कार्यकर्ते काहीसे शांत झाले. (वार्ताहर)