शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

अभियंत्यांचे आदेश धाब्यावर; काम सुरु

By admin | Updated: June 30, 2016 00:06 IST

वैभववाडी पंचायत समितीची इमारत : निकृष्ट कामाकडे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रकाश काळे -- वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम पाडण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश धाब्यावर बसवून मक्तेदाराने काम रेटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विशेष म्हणजे अडीच कोटींच्या इमारतीचे बांधकाम केवळ पावसाच्या पाण्यावर सुरु आहे. मात्र, या बेबंदशाहीकडे तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधकांनीही कानाडोळा केला आहे. त्यामुळे इमारतीचे भवितव्य धोक्यात असून वैभववाडी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.२ कोटी ५४ लाख खर्चाच्या प्रशासकीय मंजुरीनुसार पंचायत समितीच्या इमारतीचा मक्ता कसाल येथील सिध्दी असोसिएट्सने घेतलेला असून आॅगस्ट २0१६ ही इमारत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. मक्तेदाराने केलेल्या करारानुसार मुदत संपायला शेवटचे दोन महिने शिल्लक असताना गेल्या पावणे दोन वर्षात इमारतीचे बांधकाम जेमतेम ३0 टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण कधी होईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.शाखा अभियंता, लोकप्रतिनिधींचा कानाडोळा?तत्कालीन कार्यकारी अभियंता साळोखे यांच्या आदेशानुसार इमारतीच्या बांधकामापैकी निकृष्ट भाग पाडून नंतरच पुढे काम करुन घेतले जाईल, अशी ग्वाही पंचायत समिती सभेत शाखा अभियंता पद्माकर चांडके यांनी दिली होती. परंतु, कार्यकारी अभियंत्यांचा आदेश धाब्यावर बसवून मक्तेदाराने काम सुरु करुन स्लॅबची तयारी केली आहे. तरीही शाखा अभियंता किंवा लोकप्रतिनीधी इमारतीचा निकृष्ट भाग पाडण्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज सुरु असून नाराजीही व्यक्त केली जात आहे.मक्तेदार, स्थानिक अधिकाऱ्यांची धडपड ८0 लाखांसाठी ?इमारतीच्या बांधकामावरील पाण्याचा खर्च वाचविण्यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात कासवगतीने हालचाली सुरु होत्या. २ कोटी ५४ लाखांपैकी आतापर्यंत ९० लाख रुपये इमारतीवर खर्च घालण्यात आले असून पुढच्या टप्प्यातील ८० लाख शासनाकडून बांधकामला प्राप्त झाले आहेत. त्यामुळेच उन्हाळ्यात जवळपास बंद असलेल्या पंचायत समिती इमारतीच्या कामाची गती पाऊस सुरु होताच अचानक वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांत भिंतीचे काम पूर्ण करुन मक्तेदाराने स्लॅबची तयारी केली आहे. स्लॅब झाल्यावर ते ८० लाख पटकन खर्ची घालण्यासाठी मक्तेदाराची आणि स्थानिक अधिकाऱ्यांची धडपड असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.दीड वर्षात मक्तेदाराला तब्बल १0 पत्रेमक्तेदाराने इमारतीच्या कामात चालढकल करीत असल्याने नोव्हेंबर २०१४ पासून जूनपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने इमारतीच्या बांधकामाबाबत तब्बल दहा पत्र पाठविलेली असून त्यापैकी बहुतांश पत्रे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिलेली आहेत. परंतु, मक्तेदाराने कामाच्या गतीमध्ये जराही वाढ केलेली नाही. कामात चालढकल होत असल्याने दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल, असेही बांधकामने लेखी कळवूनही मक्तेदाराने जुमानलेले नाही. तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग मक्तेदारावर कारवाईला टाळाटाळ करीत असल्याने बांधकामच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.बांधकामच्या नोटीशीला केराची टोपली इमारतीचे बांधकाम सुरुवातीपासूनच रडतखडत सुरु आहे. बांधकामाचा काही भाग निकृष्ट दर्जाचा व चुकीच्या पद्धतीने उभारला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता साळोखे यांनी निकृष्ट काम पाडून ते पुन्हा करावे. त्याशिवाय पुढे काम करु नये, अशी नोटीस बांधकामने सिध्दी असोसिएट्सला दिली आहे. परंतु, मक्तेदाराने बांधकामच्या नोटीशीला केराची टोपली दाखवत इमारतीच्या स्लॅबची तयारी केली आहे. तरीही जिल्हा परिषदेचे स्थानिक अधिकारी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यास टाळाटाळ करुन ठेकेदाराच्या मनमानीकडे दुर्लक्ष करीत आहेत.बांधकाम चाललंय पावसाच्या पाण्यावर!इमारतीच्या बांधकामावर पाणी मारण्याची कुठलीही व्यवस्था मक्तेदाराने केलेली नाही. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान इमारतीचे पिलर्स उभारण्यात आले. परंतु, त्यावरही पाणी मारले गेले नसल्याने एकावेळेस पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीवरील कामगारांना जाब विचारला होता. तेव्हापासून इमारतीचे कामच बंद ठेवण्यात आले होते. ते आता पावसात सुरु केले आहे. त्यामुळे इमारतीचे संपूर्ण काम पावसाच्या पाण्यावरच केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या कामावर पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर झाला नसल्याचे दिसूनही शाखा अभियंता ही बाब गांभिर्याने घ्यायला तयार नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.