चिपळूण : सरकारी कामात अडथळा आणणे, कार्यकारी अभियंता व शाखा अभियंत्यांना मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी मंगळवारी नगरसेवक राजू देवळेकर यांना अटक केली. ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता मकरंद देवेंद्र आवळेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात नगरसेवक राजू देवळेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. न्यायालयाने देवळेकर यांना १५ हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला.
अभियंत्यास मारहाण; नगरसेवकाला अटक
By admin | Updated: July 1, 2015 00:22 IST