शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

नगरसेवकांच्या माहिती मागण्याला कर्मचारी कंटाळल

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

राजकारण तापले : चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारो

चिपळूण : काही नगरसेवक माहितीच्या अधिकाराचा वापर करुन विविध विभागांकडून १० ते १५ वर्षाची माहिती वारंवार मागत असल्याने कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे कार्यालयीन नियमित कामे करण्यास विलंब होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अन्यथा मुख्य सभेला विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा चिपळूण नगर परिषद कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांना देण्यात आले. यावेळी नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत हळदे, उपाध्यक्ष रफीक सुर्वे, उपाध्यक्ष दिलीप खापरे, सेक्रेटरी सचिन शिंदे, खजिनदार राजेंद्र खातू, महेश जाधव, सल्लागार विलास चव्हाण आदींसह कर्मचारी संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते. काही सदस्यांकडून वारंवार माहिती अधिकाराचा वापर करुन माहिती मागविली जाते. त्यासाठी नियमित कामे सोडून कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागतो. सदस्य हे नगर परिषदेचे विश्वस्त आहेत. त्यामुळे नगर परिषदेतर्फे होणारी विविध विषयांची माहिती व अभिलेखबाबत संपूर्ण माहिती त्यांना अवगत आहे. शिवाय आवश्यक ती माहिती समक्ष विचारणा केल्यास त्यांना पाहण्याचा अधिकार आहे. परंतु, तसे न करता काही नगरसेवक माहिती अधिकाराखाली वारंवार माहिती मागवून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्य सभेमध्ये सदस्यांकडून विषयांकित कामाबाबत संबंधित कर्मचारी अथवा विभागप्रमुख यांना टार्गेट करुन विविध प्रश्नांचा भडिमार करुन मूळ विषयाव्यतिरिक्त अन्य विषयांची माहिती विचारली जात आहे. होत असल्याने कोणत्याही मुख्य सभेला संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. होणाऱ्या त्रासाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)