शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीप्रश्नी भाजपचे पालिकेला स्मरणपत्र

By admin | Updated: May 14, 2016 00:17 IST

कारवाई न झाल्यास आंदोलन : ठेकेदारावर कारवाईच्या नोटिसा बजावल्या

मालवण : मालवण नगर परिषदेच्या पर्यटन सुविधा केंद्रात पालिकेच्या वीज मीटरवरून व्यावसायिक वापरासाठी वीजचोरी होत आहे. याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेत संबंधित दोषी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र एक महिना उलटला तरी पालिका प्रशासनाकडून संबंधितावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शहर भाजपच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांना स्मरणपत्र देत सात दिवसांत कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष भालचंद्र राऊत यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. मालवण नगरपरिषदेच्या पर्यटन सुविधा केंद्रात वीज मीटरवरून व्यावसायिक वापरासाठी वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. पर्यटन केंद्रात २००९ सालापासून वीजचोरी होत असल्याने हा जनतेच्या मालमत्तेचा गैरवापर असून संबंधित दोषी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी भूमिका घेतली होती. याप्रश्नी भाजपच्या वतीने गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी राऊत यांच्यासह शहर उपाध्यक्ष मनोज मोंडकर, सरचिटणीस संदीप शिरोडकर उपस्थित होते . प्रशासनाकडून तांत्रिक बाबी पूर्ण करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून तसेच थकीत भाडेसुद्धा जमा करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे. ही दंडात्मक रक्कम संबंधित ठेकेदाराने जमा न केल्यास त्याच्यावर नगरपरिषद कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची मिळकत जप्त करण्यात येईल, असे मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले. तर भाजप मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे एलईडी योजनेसाठी पाठपुरावा केला होता. याबाबत पालिकेला निधी प्राप्त झाल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.थकीत भाडेकरूंवर कारवाई करापर्यटन सुविधा केंद्राच्या बोर्डवर लोकप्रतिनिधीचा मोबाईल नंबर असल्यामुळे यामध्ये त्यांचा याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत त्याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई व्हावी अशीही मागणी करण्यात आली. मालवण शहरातील नगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व पर्यटन सुविधा केंद्र तसेच व्यापारी गाळे यांचीसुद्धा तपासणी करण्याचे मान्य करून थकीत भाडे असलेल्या गाळे व पर्यटन सुविधा केंद्रधारकांवर कारवाई करण्याचे मान्य केले. बंदर जेट्टीजवळील गटारामध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याबद्दल विचारले असता त्याची व्यवस्था करण्याचे मान्य केले.