शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग प्रस्ताव कसा देतील, दीपक केसरकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2022 16:43 IST

Deepak Kesarkar: त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत  असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

- अनंत जाधवसावंतवाडी - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2014 साली सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव घेऊन आले होते अशी केलेली टीका चुकीची आहे. त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत  असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले,कोल्हापूर सारख्या एका शाहूनगरी चा मला पालकमंत्री करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो कोल्हापूर चा पर्यटन दृष्ट्या विकास करणारच पण उद्योग व्यवसायातही कोल्हापूर अग्रेसर राहिल यांची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे गटाचा दसरा मेळावा हा न भुतो ना भविष्याती असाच होणार आहे. शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच मोठ्याप्रमाणात शिवसैनिक दसरा मेळाव्यात सहभागी होतील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो शिवसैनिक मुंबई ला येणार असून त्याचे नियोजन ही योग्य प्रकारे सुरू आहे असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टिकेला ही मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले 2014 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत निर्णय प्रकियेत नव्हते मग ते प्रस्ताव कसा काय घेऊन येतील आणि कामानिमित्त कोण ही कोणाला भेटू शकत नाही का असा सवाल करत प्रस्ताव देण्याचे काम शिंदे यांनी केले तर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश असेल आणि नंतर त्यांनीच काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली हे ही सर्वानी पाहिली असे मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेAshok Chavanअशोक चव्हाण