शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आठ बंडखोरांची सेनेतून हकालपट्टी

By admin | Updated: February 16, 2017 23:30 IST

राजापुरात सात; रत्नागिरीत एकाचा समावेश

राजापूर/रत्नागिरी : शिवसेनेची पक्षशिस्त मोडून पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या राजापुरातील सात, तर रत्नागिरीतील एका पदाधिकाऱ्याला तत्काळ बाहेरचा मार्ग दाखवून शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.शिवसेनेतील बंडखोरी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही शमली नाही. त्यानंतरही सेनेच्या विरोधात बंडखोरांनी काम सुरू ठेवल्याने रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेचे गोळप उपविभागप्रमुख राकेश साळवी यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी एका पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.राजापूर तालुक्यातही शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये ओणी गटातून माजी तालुका संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचल गटातून पूर्वा पाथरे, कोदवली गणातून अभिजित गुरव यांनी पक्षाला थेट आव्हान देत आपले अर्ज सादर करीत ते कायम ठेवल्याने शिवसेनेपुढील अडचणीत वाढ झाली आहे. त्यातूनच सेनेतील नाराजीचे उघड दर्शन झाले होते.पक्षालाच थेट आव्हान देणाऱ्या बंडखोरांसमवेत त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी थेट मातोश्रीवर गेल्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘त्या’ बंडखोरीची दखल घेऊन सात बंडखोरांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामध्ये ओणीतून बंडखोरी करणारे माजी संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचलच्या बंडखोर उमेदवार पूर्वा पाथरे यांचे पती व पाचलचे शाखाप्रमुख प्रसाद पाथरे, पाचलचे आणखी एक शाखाप्रमुख सुरेश ऐनारकर, तळवडेचे शाखाप्रमुख संदीप बारस्कर, नेरकेवाडीचे दिलीप पवार, पाचलच्या महिला विभाग संघटक शशिकला देवरुखकर, कोदवली गणाचे उमेदवार अभिजित गुरव यांचा समावेश आहे.गुरुवारी राजापूर दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवरील कारवाईबाबतचा निर्णय सांगण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाचल शाखाप्रमुखपदी हेमंत सीताराम नारकर, पाचलचे आणखी एका शाखाप्रमुख प्रकाश धुळप, तळवडे शाखाप्रमुखपदी सुरेश गुडेकर, नेरकेवाडी रमेश शिवगण व पाचल महिला संघटकपदी अंजली कडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणादेखील तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केली आहे.अखेर शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या मंडळींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचे आता कसे पडसाद उमटतात याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)