शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचा नियोजनशून्य, भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:21 IST

दोडामार्ग तालुक्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील तेरवण-मेढे व मांगेली शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतेरवण-मेढे, मांगेली शाळेत शिक्षक अनुपस्थित विद्यार्थ्यांना थांबावे लागले व्हरांड्यात

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील तेरवण-मेढे व मांगेली शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.दोडामार्ग तालुक्याचा शिक्षण विभाग गेल्या काही दिवसांपासून नियोजनशून्य कारभारामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मांगेली देऊळवाडी शाळेतील तिन्ही शिक्षकांची पदे रिक्त झाल्याने शाळा बंद आंदोलन झाले आणि तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा पहिला प्रकार पुढे आला.

तब्बल तीन दिवसांच्या शाळा बंद आंदोलनानंतर देऊळवाडी शाळेला दोन कायमस्वरूपी शिक्षक तर दोन कामगिरीवर शिक्षक देण्यात आले. परंतु शाळा पहिल्याच दिवशी बंद राहिल्याने तालुक्यातील हा प्रकार चांगलाच चर्चेत आला.याबाबतची चर्चा थांबते ना थांबते तोच शनिवारी पुन्हा एकदा असाच प्रकार चव्हाट्यावर आला. मांगेली पळसवाडी शाळा क्रमांक दोन व तेरवण-मेढे येथील शाळा क्रमांक २ मध्ये शिक्षक शनिवारी गेलेच नाहीत. त्यामुळे शाळा बंद राहिली. परंतु विद्यार्थ्यांना मात्र शाळेच्या व्हरांड्यात ताटकळत थांबण्याची वेळ आली.

तेरवण-मेढे शाळा क्रमांक २ मध्ये एकूण दोन शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक कामगिरीवर तर दुसरा शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आला. त्यामुळे शाळेत एकही शिक्षक दिला नाही. वास्तविक या ठिकाणी पर्यायी शिक्षक पाठविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शाळा बंद राहिली. या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.नाराजी ओढवलीएका बाजूने शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र मांगेली देऊळवाडी शाळेत वर्गच न भरल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यानंतर मांगेलीमधील फणसवाडी शाळेत शिक्षक हजर न झाल्याने एक दिवस शाळा बंद राहिली. असे दोन प्रकार वारंवार घडले. त्यामुळे तालुक्याचा शिक्षण विभागावर नाराजी ओढवली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग