शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

राजकीय अतिक्रमणाचा सुरूंग

By admin | Updated: July 21, 2015 00:55 IST

रत्नागिरी पालिका : भाजप - शिवसेनेत रंगणार कलगी - तुरा

रत्नागिरी : शहरातील अतिक्रमणांची समस्या संपवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पालिका व सुरक्षा समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अतिक्रमण हटाव मोहीम येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. मात्र, अतिक्रमण करणाऱ्या संबंधितांनी राजकीय नेत्यांच्या आडून या मोहिमेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप - शिवसेनेत यावरून कलगी-तुरा रंगणार असून, सेनेचे आमदार राजन साळवीही आता आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेवर झालेल्या राजकीय अतिक्रमाणाचा गतिरोधक ओलांडूनच यंत्रणेला कारवाई करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी शहरातील अतिक्रमणाची समस्या आज-कालची नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून ही समस्या रत्नागिरीत आहे. अतिक्रमणांचे प्रमाण वाढतच आहे. आता रत्नागिरी शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत असल्याने व त्याबाबतचे निकष पूर्ण करणे आवश्यक असल्याने अतिक्रमणांची सफाई प्रथम करावी लागणार आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनानेही पालिकेला सहकार्य देण्याची तयारी दर्शवित या मोहिमेत सहभाग घेतला आहे. ही मोहीम केवळ पालिकेनेच राबवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला होता. काही अतिक्रमणे हटवण्यातही आली होती. परंतु राजकीय अभय असलेली अतिक्रमणे हटविणे शक्य झाले नव्हते. मात्र, त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे यश आले नव्हते. आता स्मार्ट सिटीचे निमित्त आहे व जिल्हा प्रशासनाचा त्यात सहभाग असल्याने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. साळवी स्टॉप येथून शहराची सुरुवात होते. या ठिकाणापासून दांडा फिशरीजपर्यंत ७ ते ८ किलोमीटर्स लांबीच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिकेने अतिक्रमणांच्या ठिकाणांची यादीही तयार केली आहे. या मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या पालिकेच्या जागेत जी अतिक्रमणे आहेत ती हटवली जाणार आहेत. त्यामध्ये फिरत्या विक्रीचे परवाने दिलेल्या परंतु एकाच जागी राहून विक्री करणारे हातगाडीवरून खाद्य, वस्तू विक्री करणारे सुमारे ८० पेक्षा अधिक विक्रेते आहेत. त्यांनी केलेली अतिक्रमणे या मोहिमेत हटवली जाणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे रस्त्याच्या लगत अतिक्रमणे केल्याचे पालिकेला आढळून आले आहे. धार्मिक स्थळांच्या शेजारी रस्त्याची, पालिकेची जागा वापरली गेली आहे. काही व्यावसायिकांनीही त्यांच्या दुकानांची छपरे गटारांच्या पुढे वाढविली आहेत. गटारांवर बांधकामेही करण्यात आली आहेत. याशिवाय ज्यांनी रस्त्यालगत असलेल्या पालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, त्यांनाही हटविले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या विषयांवरून रत्नागिरीतील राजकीय वातावरण पेटले आहे. हातगाडीवाल्यांना रस्त्यावर अडचण येणार नाही, अशा जागा वापरासाठी दिल्या जाव्यात, अशी मागणीही होत आहे. शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांवरही अनेक अतिक्रमणे आहेत. मिरकरवाडा, उद्यमनगर, कोकणनगर या भागात अतिक्रमणांची संख्या मोठी आहे. मात्र ही अतिक्रमणे हटवण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे चित्र आहे. राबवण्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम कितपत यशस्वी ठरणार, याबाबत आता नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)