शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता सामंत यांनाही विधिमंडळात नेणार!, माजी खासदार निलेश राणेंचा ठाम विश्वास

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 24, 2022 12:25 IST

विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मी आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा. लोकांसाठी, समाजासाठी काम करत राहायचे. याच भावनेतून काम करत असताना पक्षाचे आदेश व देवाच्या इच्छेने आमदार झालो तर माझ्या नंतर दत्ता सामंत यांनाही त्याच सन्मानाने विधिमंडळात नेणे हेच माझे प्रयत्न राहतील. असे ठाम मत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण घुमडे येथे बोलताना व्यक्त केले.दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी निलेश राणे व दत्ता सामंत यांची दिलखुलास भाषणे झाली. राजकीय टोलेबाजीही यावेळी रंगली.यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या भजन स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. सामंत यांचे कार्य व कार्यक्रम कधीच फायद्यासाठी नसतात तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी असतात. तसेच त्यांचे कार्यक्रम आयोजन वेगळ्या उंचीचे व दर्जेदार असतात. ही भजन स्पर्धाही यशस्वी झाली.यालाही मनाचा मोठेपणा लागतोयाठिकाणी दत्ता सामंत यांच्यासह सगळेच माझ्या आमदारकीसाठी सदिच्छा व्यक्त करतात. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा पक्षाचे आदेश असतील. मात्र दत्ता सामंत सारखी माणसे मनाने मोठी आहेत. दुसऱ्याला मोठे करणे, मोठे व्हा हे त्यांचे सांगणे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. त्यांनी माणसे कमावली. राणे साहेबांसोबत ते निष्ठेने राहिले. राजकारणसाठी त्यांनी काही केले नाही. केवळ समाजकारण केले. जनतेची सेवा हीच राणे साहेबांची शिकवण आहे. त्याच धर्तीवर आम्हीही कार्य करतो. दत्ता सामंत आणि आमच्यात आपुलकीचे नाते आहे. आम्ही सांघिक खेळ खेळतो. मैदानात खेळ खेळायला आम्हाला आवडते. म्हणजेच सर्वांसोबत राहायला आम्हाला आवडते. जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे.कितीही विष कालवलं तरी राणे-सामंत वेगळे होणार नाहीतसर्वांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो तर विधिमंडळ सभागृहात दत्ता सामंतही असतील हे निश्चित. दत्ता सामंत माझे मोठे भाऊ आहेत आणि हे नाते कायम राहील. मी पक्षाकडे त्यांच्यासाठी शिफारस करणार. विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत. त्यांच्यात दुरावा असणार नाही असेही निलेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Politicsराजकारण