शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनामतच्या कमिशनवर डल्ला

By admin | Updated: October 6, 2015 23:42 IST

तिलारी प्रकल्पातील प्रकार : ठेकेदार धास्तावले, पाटबंधारे मंत्र्यांकडे तक्रार

सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाची सर्व कामे गेली दोन वर्षे ठप्प असल्याने तसेच शासनाने निधीच न दिल्याने ठेकेदारांनी आपली अनामत रक्कमच काढून घेण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र, या अनामत रकमेच्या कमिशनसाठी अधिकारी तगादा लावत थेट डल्ला मारत असल्याने ठेकेदाराची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. याबाबत काही ठेकेदारांनी थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद आहेत. शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे आहे. मात्र, यातील शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले असून, उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही. अनेकवेळा ठेकेदार संघटनांनी पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागितली. पण अद्यापपर्यंत पैसे देण्यात आलेले नाहीत. तिलारी हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने महाराष्ट्र सरकार गोव्याकडे बोट दाखवत असून, गोवा सरकार महाराष्ट्रकडे बोट दाखवत आहे. गोव्याकडून महाराष्ट्र सरकारला ५४ कोटी रूपये येणे असून, तेही पैसे अद्यापपर्यंत दिले गेलेले नाहीत.शासनाकडून केलेल्या कामांचे पैसे मिळत नसतील, तर आमची अनामत रक्कम परत द्या, असे म्हणत १५ ठेकेदारांनी आपली अनामत रक्कम कालवा विभागातून काढून घेतली. तब्बल २५ ते ३० लाखांची ही रक्कम आहे. मात्र, ही रक्कम घेणाऱ्या ठेकेदारांना वेगळ््याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या अनामत रक्कमेवरही अधिकाऱ्याने कमिशनचा डल्ला मारल्याने अनेक ठेकेदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. अन्य ठेकेदारांनी अनामत रक्कमेसाठी अर्ज केला आहे.कारण ही अनामत रक्कम प्रत्येक ठेकेदाराला काम घेण्यापूर्वी कार्यालयाला जमा करावयाची असते आणि काम संपल्यावर ती काढून घ्यायची असते. याच रक्कमेच्या कमिशनवर अधिकाऱ्याने डल्ला मारण्यास सुरूवात केल्याने ठेकेदारांनी याबाबत थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच तिलारी धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवा विभागाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. पूर्वीचे पैसे द्या अन्यथा पुढील कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने तिलारी प्रकल्प सध्या ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)मंत्री, अधिकाऱ्यांना ठेकेदार भेटतातयाबाबत तिलारी प्रकल्पाचे ठेकेदार राजन म्हापसेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ठेकेदार हे नेहमीच अधिकारी व मंत्री यांना भेटत असतात. त्यामुळे कोणी तक्रार केली याची मला माहिती नाही. मात्र, असा प्रकार घडला असेल तर तक्रार केल्याचेही नाकारता येत नाही, असे म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद.शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे.शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले.महाराष्ट्र सरकार दाखवतेय गोव्याकडे बोट.अनेक ठेकेदार झाले आहेत हवालदिल.