शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, सामूहिक रजा आंदोलनामुळे जीएसटी कार्यालय ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:32 IST

वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे विविध मार्गाने आंदोलने करूनही शासनाने दुर्लक्ष केले. मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वस्तू व सेवा कार्यालयात शुकशुकाट होता.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी केले काम प्रमुख मागण्यांसाठी पुकारले सामूहिक रजा आंदोलन जिल्हाभरातून कामानिमित्त दाखल झालेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले मागे

ओरोस : वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे विविध मार्गाने आंदोलने करूनही शासनाने दुर्लक्ष केले. मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वस्तू व सेवा कार्यालयात शुकशुकाट होता.४ व ५ जानेवारी या कालावधीत रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. घाडीगावकर यांनी दिला. त्यानुसार हे आंदोलन सुरू झाले असून गुरुवारी कार्यालयात कोणीही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी जिल्हाभरातून कामानिमित्त दाखल झालेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने मागे परतावे लागले.वस्तू व सेवा कर विभागातील गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरावीत, वेतन त्रुटीचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, सेवा भरती नियमांमध्ये बदल करताना संघटनांना विश्वासात घ्यावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धर्तीवर समान काम, समान पदे व समान वेतन ही त्रिसूत्री लागू करावी, विभागातील संवर्ग वाटप व संरचना अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.

मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे सामूहिक रजा आंदोलन छेडीत आहेत. यापूर्वी ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी काम केले होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय