शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची सुरुवात, समुद्राला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:31 IST

 ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देसमुद्राला उधाण, किनाऱ्याला मोठा तडाखासमुद्राच्या उधाणाचे पाणी वस्तीत घुसले किल्ले दर्शनासह अन्य जलक्रीडा प्रकार आणखी दोन दिवस बंद राहणार

सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.

वेंगुर्लेत बंदरावर नांगरून ठेवलेल्या ७ फायबर होड्या सोमवारी रात्री समुद्रात बुडाल्या आहेत. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार गोसावी यांच्याकडून पाहणी करण्यात आली असून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. 

ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेच्या वातावरणातील बदलांमुळे आंबोलीपासून बांद्यापर्यंत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.वादळामुळे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. बुधवारीही जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील; शिवाय पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.समुद्राला उधाण, किनाऱ्याला मोठा तडाखासिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्याला मोठा तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसले. किनाऱ्यावरील मच्छीमार आणि स्थानिक रहिवशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसला आहे. पिरावाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर देवबागमध्ये कुलेर्वाडीत पाणी घुसलं आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव व ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. देवबाग मोंडकरवाडी येथे समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसले आहे.

किल्ले दर्शनासह अन्य जलक्रीडा प्रकार आणखी दोन दिवस बंद राहणार आहेत.  वादळसदृश परिस्थिती आणखी दोन दिवस अशीच राहणार असल्याने बंदर विभागाच्यावतीने तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे, अशी माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.  

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळSindhudurg portसिंधुदुर्ग किल्ला