शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, चाकरमान्यांची नाराजी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 1, 2022 17:11 IST

विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल

खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे काल, बुधवार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजताचे विमान खराब हवामान असल्याचे कारण सांगून अचानक रद्द करण्यात आले. या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. याबाबत खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी विमान सेवेच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने जेष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना खाण्यापिण्यासाठी वणवा करावी लागली. या विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही प्रवासी दुपारी दोन वाजल्यापासून विमानतळावर येऊन थांबले होते. विमानतळावर साधी अल्पोपहाराची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे खाण्यापिण्याचे हाल तर झालेच.परंतु दर दहा मिनिटांनी दहा मिनिटे थांबा असे वेटिंगवर ठेऊन सायंकाळी साडेसहा वाजता विमान रद्द झाले असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. अचानक विमान रद्द झाल्याचे समजताच लांबून आलेल्या प्रवाशांना माघारी जावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या विमानामध्ये खारेपाटण, तरेळे ,वैभववाडी, सावंतवाडी, मालवण या सर्व तालुक्यातील प्रवासी प्रवास करणार होते. पण त्यांनी या विमान प्रवाहाच्या सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.विमानतळ प्रशासनाचा गलथाण कारभारगणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तरी किमान सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळावर प्रवाशासाठी अत्यावश्यक सुविधा प्रशासनाने पुरविल्या पाहिजे होत्या. मात्र सद्या इथे कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर इमर्जन्सी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत ठेऊन अचानक फ्लाईट रद्द झाल्याचे सांगण्यात येऊन प्रवासी वर्गाला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने हवाई प्राधिकरणाने आपल्या गलथाण कारभारात सुधारणा करावी. - रफिक नाईक, सामाजिक कार्यकर्ते,खारेपाटण

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAirportविमानतळ