शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:26 IST

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या बैठकीत नाराजी ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा

आंबोली : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली पर्यटन स्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध विकासकामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे.

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये शासनाने विकासात्मक धोरणे राबवून आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे दिसत आहे.

या पर्यटन क्षेत्राचा विकास न होण्याचे कारण फक्त लोकप्रतिनिधी आणि शासन असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनासाठी आलेला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही आंबोली पर्यटन स्थळाची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आंबोली पर्यटन झपाट्याने वाढ होण्याचे राहिले बाजूला, पण पर्यटन क्षेत्राच्या अधोगतीचा चाप लागलेला आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

सर्व पर्यटन पाँईटची दुरवस्था झाली असल्यामुळे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाट फिरवली तर येत्या एक ते दोन वर्षात येथील पर्यटन बंद होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.आंबोली पर्यटन क्षेत्राला यापूर्वी विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ते अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. मात्र त्यांनाही आश्वासनांचे विस्मरण झाले आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग