शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:38 IST

राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देघरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव आणि संघाचे पदाधिकारी रावसाहेब पवार, गणेश जाधव, किरण चव्हाण, नीतेश पवार, शिवाजी पवार, अजय जाधव, सागर पवार, बाळकृष्ण जाधव, मनोज जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षीसुद्धा बेलदार भटका समाज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मानवी मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण राज्यावर ओढवले आहे. या महामारीच्या विळख्यात बेलदार भटका समाज सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ दखल घ्यावी, या मागण्यांसाठी बेलदार भटका समाजाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन सादरआत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपये देण्याची योजना राबवित त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना द्यावा. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक वस्तूचे भाव घोषित केले आहेत तशी आकारणी केली जात आहे का याबाबत खातरजमा करून होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालावा.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता वसंतराव नाईक महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य देऊन या समाजाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी रुळावर आणावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण