शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

Sindhudurg: मृत पिलासाठी डॉल्फिनची धडपड, तळाशील समुद्रातील हृदयद्रावक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:51 IST

संदीप बोडवे मालवण : आपल्या परिवारातील एक सदस्य जखमी होऊन मृत झाल्यानंतर हंपबॅक डॉल्फिन्स भावनाविवश होत त्याची काळजी घेत ...

संदीप बोडवेमालवण : आपल्या परिवारातील एक सदस्य जखमी होऊन मृत झाल्यानंतर हंपबॅक डॉल्फिन्स भावनाविवश होत त्याची काळजी घेत असल्याची एक हृदयद्रावक घटना मंगळवारी मालवण जवळील तळाशील समुद्रात पाहायला मिळाली. डॉल्फिन हा सागरी सस्तन प्राणी आहे. त्याच्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काही संबंध आहे का ?, याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.

तळाशील समोरील समुद्रात कवडा रॉक जवळ एक प्रौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिलाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या साहाय्याने ढकलत असल्याचे पर्यटकांना दिसले. प्रथमदर्शनी डॉल्फिन एकमेकांवर हल्ला करीत आहेत, असे वाटत होते. परंतु, जवळ जाऊन पाहिले असता, एक प्रौढ डॉल्फिन एका मृत डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत असल्याचे स्पष्ट झाले.

कोकणच्या समुद्रातील डॉल्फिनवर अभ्यास केलेले सागरी जीव संशोधक मिहीर सुळे यांनी याबाबत सांगितले की, डॉल्फिनला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. ते एखाद्या परिवाराप्रमाणे कळपाने राहतात. या कळपातील एखाद्या सदस्याला इजा झाली, तर ते त्याची काळजी घेतात. पिलांच्या बाबतीत तर अजून जास्त. तळाशील येथील घटनेत मृत डॉल्फिनचे पिल्लू हे कधी मृत झाले हे इतर डॉल्फिनच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना इतकं दुःख होत असेल की, त्यामुळे त्यांना त्या मृत पिलाला सोडवत नाही. मृत पिल्लू जिवंत आहे, असे समजून त्याला जिवंत ठेवण्यासाठी ते त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत आहेत.

अभ्यासातील पहिली घटनामिहीर सुळे म्हणाले, भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सिंधुदुर्ग परिसरात २०२० मध्ये हंपबॅक डॉल्फिन्सचा अभ्यास करताना आम्हाला त्यांच्या वागणुकीचा एक काहीसा अजब प्रकार पाहायला मिळाला. दोन कळपांमध्ये एकेका पिलाचा मृत्यू झाला होता आणि दोन्ही कळपातल्या मोठ्यांनी आणि विशेषतः त्या पिलांच्या पालकांनी तो मृतदेह अनेक दिवस तरंगत ठेवून आपल्याबरोबर ढकलत नेला होता. पहिल्या घटनेमध्ये पिलाच्या उजव्या कुशीत धडक बसल्याचे दिसत होते.

दुसरी घटनातर दुसऱ्या घटनेत आम्ही डॉल्फिनच्या शवाचे विच्छेदन केले असता, त्याच्या फुफ्फुसाला इजा झाली होती. त्यावर खपलीसुद्धा चढली होती. यातून ही ईजा आठवड्यांपूर्वी झाली असावी. या पिलाला श्वास घेता यावा, यासाठी त्याच्या कळपातील काही डॉल्फिन दर दोन-तीन मिनिटांनी त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत होते.

खोलवर अभ्यास व्हायला हवाकळपातल्या एखाद्या प्राण्याला, विशेषतः पिलाला इजा होते किंवा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा कळपात एक भीतीचे वातावरण पसरते. आम्ही अशा दोन घटना जवळून पाहिल्या आहेत आणि त्याबद्दलची निरीक्षणे नोंदविली आहेत. सस्तन प्राण्यांमधल्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, याचा खोलवर अभ्यास व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. - मिहीर सुळे, डॉल्फिन अभ्यासक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार