शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

मृत पिल्लाला जिवंत करण्यासाठी डॉल्फिनची धडपड; मालवणनजीकच्या समुद्रातील हृदयद्रावक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:11 IST

तळाशील समोरील समुद्रात एक प्रौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या साहाय्याने ढकलत असल्याचे पर्यटकांना दिसून आले. डॉल्फिन हल्ला करत आहेत, असे वाटत होते. परंतु...

संदीप बोडवे

मालवण : आपल्या परिवारातील एक सदस्य जखमी होऊन मृत झाल्यानंतरसुद्धा त्याची काळजी घेत असल्याची घटना मालवण जवळील तळाशील समुद्रात पाहायला मिळाली. हा प्रकार हंपबॅक डॉल्फिन्सच्या बाबतीत घडला आहे. प्राण्यांमधील या प्रकाराला असे म्हटले जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सस्तन प्राण्यांमधल्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, याचा अभ्यास व्हायला हवा, असेही ते म्हणाले.

तळाशील समोरील समुद्रात एक प्रौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या साहाय्याने ढकलत असल्याचे पर्यटकांना दिसून आले. डॉल्फिन हल्ला करत आहेत, असे वाटत होते. परंतु, जवळ जाऊन पाहिले असता, एक प्रौढ डॉल्फिन मृत डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत असल्याचे स्पष्ट झाले.

श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागतेकोकणाच्या समुद्रातील डॉल्फिनवर अभ्यास केलेले सागरी जीव संशोधक मिहीर सुळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली असता ते म्हणाले, डॉल्फिन हे सागरी सस्तन प्राणी आहेत. त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. ते एखाद्या परिवाराप्रमाणे कळपाने राहतात.

या कळपातील एखाद्या सदस्याला इजा झाली, तर ते त्याची काळजी घेतात. पिल्लांच्या बाबतीत, तर अजून जास्त. तळाशील येथील घटनेत मृत डॉल्फिनचे पिल्लू हे कधी मेले हे इतर डॉल्फिनच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना इतकं दुःख होत असेल की, त्यामुळे त्यांना त्या मृत पिल्लाला सोडवत नाही. मृत पिल्लू जिवंत आहे, असे समजून त्याला जिवंत ठेवण्यासाठी ते त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत आहेत.

अभ्यासातील पहिली घटना- मिहीर सुळे म्हणाले, भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सिंधुदुर्ग परिसरात २०२० मध्ये हंपबॅक डॉल्फिन्सचा अभ्यास करताना आम्हाला त्यांच्या वागणुकीचा एक काहीसा अजब प्रकार पाहायला मिळाला. - दोन कळपांमध्ये एकेका पिल्लाचा मृत्यू झाला होता आणि दोन्ही काळपातल्या मोठ्यांनी आणि विशेषतः त्या पिल्लांच्या पालकांनी तो मृतदेह अनेक दिवस तरंगत ठेवून आपल्या बरोबर ढकलत नेला होता. पहिल्या घटनेमध्ये पिल्लाच्या उजव्या कुशीत धडक बसल्याचे दिसत होते. 

कळपातल्या प्राण्याला, पिल्लाला इजा होते किंवा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा कळपात एक भीतीचे वातावरण पसरते. आम्ही अशा दोन घटना जवळून पाहिल्या आहेत आणि त्याबद्दलची निरीक्षणे नोंदवली आहेत. सस्तन प्राण्यांमधल्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, याचा खोलवर अभ्यास व्हायला हवा, असे आम्हाला वाटते.- मिहीर सुळे, डॉल्फिन अभ्यासक

अभ्यासातील दुसरी घटना- दुसऱ्या घटनेत आम्ही डॉल्फिनच्या शवाचे विच्छेदन करून अभ्यासले असता, त्या पिल्लाच्या फुफ्फुसाला इजा झाल्याचे दिसून आले होते आणि त्यावर खपली सुद्धा चढली होती.- यातून ही इजा काही दिवसांपूर्वी  झाली असल्याचे समजले. या पिल्लाला श्वास घेता यावा, यासाठी त्याच्या कळपातील काही डॉल्फिन दर दोन-तीन मिनिटांनी त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत होते. 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनारा