शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात बेकायदेशीर वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:53 IST

दोडामार्ग शहरातून मोठी वाहने वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याने बुधवारी दोडामार्ग शहरवासीयांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. जोपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाहतुकीवर ठोस कारवाई होत नाही व कायमस्वरूपी बाजारातून अवजड वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला होता.

ठळक मुद्देदोडामार्गात बेकायदेशीर वाहतूक रोखलीदोडामार्ग शहरवासीयांचा आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातून मोठी वाहने वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याने बुधवारी दोडामार्ग शहरवासीयांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. जोपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाहतुकीवर ठोस कारवाई होत नाही व कायमस्वरूपी बाजारातून अवजड वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला होता.यावेळी दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष योगेश महाले, स्वाभिमान शहराध्यक्ष दादा बोर्डेकर, काँग्रेस शहराध्यक्ष संदेश बोर्डेकर, समीर रेडकर, रंगनाथ गवस, निलेश रेडकर, विशाल चव्हाण आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.दोडामार्ग शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत बऱ्याच वेळा कल्पना देऊनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने दोडामार्ग युवकांमध्ये नाराजी असून युवकांनी पुन्हा एकदा एकत्र येत वाहने रोखली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करा, असे उपस्थित युवकांनी सांगितले. पोलिसांनी हे काम वाहतूक पोलिसांचे असल्याचे सांगत हात वर केले.ट्रक रोखलेदोडामार्ग शहरातील संतप्त युवकांनी ट्रक रोखले. जोपर्यंत अवजड वाहतूक बाजारपेठेतून कायमस्वरूपी बंद होत नाही तसेच या गाड्यांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग