वेंगुर्ले : शिवसेना पक्ष हे एक कुटुंब असून कुटुंबातील भांडणे चव्हाट्यावर येता नये. वेंगुर्ले तालुक्यातील नवीन- जुन्या कार्यर्त्यांनी एकदिलाने शिवसेना पक्षासाठी काम करावे आणि आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले.पालकमंत्री केसरकर रविवारी वेंगुर्ले दौऱ्यावर आले असता त्यांनी सागर बंगल्यावर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सुचिता वजराठकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी कुबल, शिवसेना शहर प्रमुख विवेकानंद आरोलकर, उपशहरप्रमुख राजन वालावलकर, माजी नगरसेविका श्वेता हुले, माजी नगरसेवक सुरेश भोसले, उमेश येरम, सचिन वालावलकर, रमेश नार्वेकर, आनंद बटा, नाना वालावलकर, सतीश हुले उपस्थित होते. वेंगुर्ले शहरातील रस्ते हे बांधकाम विभागाकडे असल्याने शहरात विकासकामे होताना अडचणी येत होत्या. आता हे रस्ते नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती यावेळी केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले बंदरावर पर्यटकांना जाण्यासाठी लवकरच लिफ्टची सोय करण्यात येणार आहे. मांडवी खाडीतील गाळांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पोकलंड खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. वेंगुर्ले ते मठ मार्गे कुडाळ हा रस्ता खराब झाला असून तो लवकरात लवकर वहातुकीस योग्य करावा अशी मागणी कार्यत्र्यांनी केली. हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.(प्रतिनिधी)एकोप्याने काम करावेंगुर्ले शिवसेनेत सध्या चालू असलेल्या अंतर्गत वादाबद्दल केसरकर यांनी खेद व्यक्त करुन शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुने-नवे हे भेदभाव न पाळता एकोप्याने कामाला लागावे. २0१६ मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेली शहरातील विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवावीत व नगरपरिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल, याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही केसरकर यांनी केले.
कुटुंबातील भांडणे चव्हाट्यावर नको : केसरकर
By admin | Updated: July 27, 2015 00:32 IST