शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

आपल्याला दिलेला त्रास इतरांना नको

By admin | Updated: July 21, 2016 00:55 IST

प्रफुल्ल सुद्रीक : कार्यकाल संपल्याने व्यक्त केल्या भावना ; विनोद जाधव यांची नियुक्ती

कुडाळ : जिल्हा युवक राष्ट्रवादी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदावरील तीन वर्षांच्या कालावधीत पक्षसंघटना बांधणी व वाढीसाठी तसेच पक्षाचे ध्येय, विचार तळागाळात पोचविण्याचे काम केल्याने समाधानी आहे. काहींनी या कालावधीत खूप त्रास दिला, तो पुढील पदावरील व्यक्तीला देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवक संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी व्यक्त केली. जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने प्रफुल्ल सुद्रीक यांनी आपल्या भावना प्रसिद्धीपत्रकांतून व्यक्त केल्या. या पदावर पक्षाने कुडाळ तालुक्यातील माणगावातील विनोद जाधव या युवा कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून माझे वडील सुरेश सुद्रीक यांच्यापासून मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व आताचे युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आपल्याला सिंधुदुर्ग युवक राष्ट्रवादी संघटनेचा जिल्हाध्यक्ष केले. या जबाबदारीने आपल्यातील अनेक पैलू जागे होऊन तळागाळातील कार्यकर्त्यांशी आपली नाळ जुळली. यामुळे आपण आपल्या कारभारावर समाधानी आहोत. खरे तर या संघटनेचे युवक जिल्हाध्यक्षपद हे दीड वर्षासाठी असते. मात्र, आपला दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर या पदी पक्षाच्या नेत्यांनी माझीच निवड केली हा माझा वरिष्ठांनी केलेला गौरवच आहे. युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आपणास या पदाबाबत विचारले होते, पण आपण त्यांना नकार दिला होता. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगत आपणावर टाकलेली कोणतीही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आता तरी त्रास द्यायचा सोडापदासह खुर्चीसाठी लाचार न होता, तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे केल्यानेच जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली. पण पदाच्या हव्यासापोटी एका ने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झाला नाही. माझी फेरनिवड करण्यात आली. नुतन जिल्हाध्यक्षांना असा त्रास न देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.