शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

मागासवर्गीय लाभार्थ्यांचे प्रस्ताव नाकारू नये

By admin | Updated: December 27, 2014 00:00 IST

अंकुश जाधव : जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभेत आदेश

सिंधुदुर्गनगरी : २० हजार उत्पन्न मर्यादेच्या कारणास्तव मागासवर्गीय लाभार्थ्यांचा एकही प्रस्ताव नाकारण्यात येऊ नये. लोकांच्या सेवेसाठी आम्ही बसलो आहोत. त्यामुळे प्रस्ताव मागे न पाठवता कागदपत्रे रंगवून आॅडीट पॉइंटचे मुद्दे तुम्ही सांभाळा. २० हजाराच्या उत्पादनाच्या दाखल्यासाठी मागासवर्गीय लाभार्थ्यांचे प्रस्ताव नाकारू नये, असे सक्त आदेश समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी समाजकल्याण समिती सभेत अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, वृंदा सारंग, आस्था कर्पे, पुष्पा नेरूरकर, सुभाष नार्वेकर, समिती सचिव अशोक भारती, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी विविध विकास योजना राबविल्या जातात. मात्र या योजना राबविताना लाभार्थी उत्पन्न मर्यादाही घालण्यात आली आहे. यासाठी २० हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ दिला जात असल्याची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी समिती सदस्यांनी केली. यावर आक्रमक झालेल्या सभापती अंकुश जाधव यांनी या मुद्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २० हजार उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणारी जाचक अट रद्द करून ती वाढवून ४० हजारापर्यंत करण्यात यावी, असा ठरावही घेण्यात आला. तसेच उत्पन्न या कारणावरून मागासवर्गीयांनी केलेला एकही प्रस्ताव मागे जाता नये, याची दक्षता घ्या. कागदपत्र रंगवून व आॅडीट पॉर्इंटचे मुद्दे सांभाळून प्रस्ताव मंजूर करा, असे आदेश जाधव यांनी दिले. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी ग्रासकटर व पॉवर स्प्रे या योजनेसाठी मागासवर्गीयांना सात-बारा असल्याची अट शिथिल करावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच या वरील दोन योजना राबविताना लाभार्थी हिस्सा १० टक्के असावा, असाही निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)समाजकल्याणची रंगीत तालीम थांबवासमाजकल्याण विभागाला गेली अडीच वर्षे समाजकल्याण अधिकारी पद न मिळाल्याने या विभागाची सध्या रंगीत तालीम सुरू आहे. या पदाचा कार्यभार प्रभारी समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात आहे. परंतु ते पदही एकाच अधिकाऱ्याकडे नसल्याने या विभागाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. नामधारी का असेना, पण या विभागाला कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, असेही यावेळी अंकुश जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.