शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बॅँक संचालकांत उत्सुकता निकालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:45 IST

लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक व त्यांचे संचालक मंडळ केंद्रस्थानी राहिल्यामुळे आता संचालकांत निकालाविषयीची चर्चा रंगली असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॅँकेतील दोन संचालकच या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने बॅँकेतील राजकारणही त्यांच्याभोवती फिरत आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बॅँक संचालकांत उत्सुकता निकालाचीनिवडणुकीत बॅँकेतील दोन संचालकच प्रमुख प्रतिस्पर्धी

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक व त्यांचे संचालक मंडळ केंद्रस्थानी राहिल्यामुळे आता संचालकांत निकालाविषयीची चर्चा रंगली असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॅँकेतील दोन संचालकच या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने बॅँकेतील राजकारणही त्यांच्याभोवती फिरत आहे.सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या राजकारणाशी सांगली जिल्हा बॅँक जोडली गेली आहे. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील हे दोघेही जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत. दोघेही प्रमुख उमेदवार असल्यामुळे जिल्हा बॅँकेचे संचालकही या दोन्ही उमेदवारांमध्ये विभागले गेले आहेत.एक खासदार, दोन आमदार, दोन माजी आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष अशी दिग्गज राजकीय मंडळी या बॅँकेत आहेत. याशिवाय अन्य संचालकांमध्येही ताकदीचे राजकारणी असल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

दिलीपतात्या पाटील हे बॅँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपविली होती. त्यामुळे जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ गेली महिनाभर लोकसभा निवडणुकीत व्यस्त दिसत होते.संचालक म्हणून काम करताना संबंधित तालुक्यातही ते किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय घडामोडींमध्ये भाग घेतला होता. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता निकालाविषयी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांत तसेच विविध क्षेत्रातील मंडळींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तशीच उत्सुकता जिल्हा बॅँकेतही दिसत आहे.राजकीय घडामोडींमध्ये सांगली जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळच केंद्रस्थानी असल्यामुळे निकालाविषयीची चर्चाही त्यांच्यात रंगली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणूनही जिल्हा बॅँकेकडे पाहिले जाते. अशा स्थितीत निवडणुकीनंतरही भविष्यातील राजकीय समीकरणांचा भाग म्हणून संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र