शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीकरांना दिलासा! करवाढीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती; मंत्री दीपक केसरकरांची मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी

By अनंत खं.जाधव | Updated: March 7, 2023 17:39 IST

'चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता'

सावंतवाडी : शहरातील करवाढ करताना मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला विश्वासात घेतले पाहिजे होते. तालुक्यात जनतेचा एकमेव लोकप्रतिनिधी सध्या कार्यरत आहे. असे असताना मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेणे चुकीचे होते. चांगले काम करणारा अधिकारी असा माझा समज होता अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील नाराजी बोलून दाखवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी वाढीव करवाढीला जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिल्याचेही स्पष्ट केले.मंत्री केसरकर म्हणाले, नगरपालिकेने वाढीव कराबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली होती. मात्र हे सर्व करत असताना एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी यांनी कल्पना देणे गरजेचे होते. ही कर वाढ वाजवी आहे की कसे? याबाबत मी खात्री करणार आहे. नगरपरिषदेवर आर्थिक बोजा असून तो पैसा करवाढीतून काढण्यात येणार आहे असे जर मुख्याधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यानी इतर मार्गाने पैशाची तरतूद करणे गरजेचे, करवाढीतून नागरिकांवर बोजा कशासाठी असा सवाल मंत्री केसरकरांनी केला.सावंतवाडी शहराच्या सुधारित नळ योजनाला ५७ कोटी रुपये लागणार आहेत त्यासाठी दोन कोटी ८७ लाख रुपये लोक वर्गणीतून भरावे लागणार आहेत. असे असेल तरी जनतेच्या माथ्यावरच कर बसणार आहे. त्यामुळे दोन कोटीची नळ योजना आणण्यात येईल. सावंतवाडी शहरात जिमखाना मैदानावर पॅव्हेलियन तसेच अद्यावत भाजी मंडई उभारण्यात येणार आहे त्यातून अतिरिक्त पैसे पालिकेला मिळेल असे मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.कोल्हापूर व मुंबईचा पालकमंत्री असल्याने तसेच सतत कामाच्या व्यापामुळे सावंतवाडी शहरावर दुर्लक्ष झाले आहे. मात्र यापुढे आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यात येणार आहे. कोट्यावधी रुपये शहराला दिल्यानंतर मी खरेतर यायची गरज नाही पण आता यावेच लागणार. अधिकारी मनमानी करत असतील गप्प बसून चालणार नाही असे सांगत मोती तलाव हे शहराचे वैभव आहे. मी नगराध्यक्ष असताना येथील सर्व अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा असे निर्देश पालिकेला दिले असून त्यावर आपण ठाम आहे. मात्र नागरिकांवर, स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर