शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर ओल्या काजूगरांची आवक लक्षणीय वाढतेय

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

बाजारपेठेत उलाढाल : हमखास उत्पन्न देणारा पर्याय बागायतदारांना उपलब्ध

फुणगूस : हापूस आंब्याबरोबरच काजूगराचे नाव निघताच कोकणची आठवण होते. काजूच्या झाडाला मोहोर आल्यानंतर कोकणवासीयांना प्रतीक्षा असते ती ओल्या काजूगरांची. सध्या बाजारपेठेत तोंडाला पाणी सुटणाऱ्या व खरेदीचा मोह न आवरता येणाऱ्या ओल्या काजूगरांची आवक सुरु झाली असून, दर मात्र चांगलाच वधारलेला आहे.कोकणात काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने सुरु झाली. त्यामुळे पहिल्या उपऱ्याचा ओला काजूगर बाजारपेठेत येण्यास उशीर होणार याचा खवय्यांना अंदाज होता. कोवळ्या काजूगरांची चव न्यारी असते. मूठभर ओले व कोवळे काजूगर जिभेवर ठेवले तरी समाधान होत नाही, अशी त्याची अवीट चव आहे.ओल्या काजूची झणझणीत उसळ व जोडीला गरमागरम भाकरी हे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान कोकणात येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी विशेष भोजन असते. सध्या अधिकतर माळरानावर असणाऱ्या काजूच्या झाडांना हिरव्यागार बियांचे घड लगडलेले दिसून येत आहेत. ओल्या बिया व काजूगर बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहेत. ओल्या काजूबियांचा दर ६० ते ७० रुपये किलो तर ओल्या काजूगरांचा एका पानाचा दर ४० रुपये एवढा वधारलेला आहे.काजूच्या उसळीबरोबरच मटणामध्ये ओले काजूगर घातले जातात. हे काजूगर या पदार्थाची चव वाढवत असल्याने ओल्या काजूगरांना बाजारपेठेत कायम मागणी असते. कोकणात ठिकठिकाणी असणारा कातकरी समाज या हंगामात काजूगर पानावर काढून विकण्याचे काम करतो. काजूवृक्षांची स्वत:ची लागवड नसताना काजूगर विकण्याची किमया या कातकरी मंडळींना कशी काय साध्य होते, हे न उलगडणारे कोडे आहे. एका पानावर २० ते २५ ओले काजूगर असतात. बाजारपेठेत आवक वाढली की, सुरुवातीला ४० रुपये असणारा दर घसरतो. या हंगामातील काजूगर नवे करण्यासाठी ओल्या काजूचा दर चढा असूनही तो मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. या भागात आता ओल्या काजूगरांची आवक लक्षणीय वाढ होत असल्याने आता या भागात ओल्या काजूगरांना मागणी वाढत आहे. (वार्ताहर)