सावंतवाडी : अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १७ व १८ जानेवारी या कालावधीत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर भूषविणार आहेत. या संमेलनात गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील साहित्यिक सहभागी होणार आहेत. यापूर्वी हे संमेलन कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, नागपूर, नाशिक येथे भरविण्यात आले हाते. यंदाचे संमेलनाचे सहावे वर्ष आहे. संमेलनाची सुरुवात १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने करण्यात येणार आहे. कवीवर्य डॉ. वसंत सावंत ग्रंथदालनाचा प्रारंभ हरिहर आठलेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शाहीर सदाशिव निकम, शीतल साठे यांच्यासह सहकारी चळवळीची गाणी सादर करणार आहेत. सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. राजन गवस, किरण ठाकूर, माजी आमदार जयानंद मठकर, प्रा. आनंद मेनसे उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याची दिशा’ या विषयावर हैदराबाद येथील माया पंडित यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. याच परिसंवादात डॉ. रणधीर शिंदे, प्रा. नितीन रिंढे, डॉ. आसाराम लोमटे, प्रा. उदय लोटे, डॉ. सुनील भिसे सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता राजा शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सांस्कृतिक आक्रमणाची सद्दी वाढत चालली आहे काय?’ या विषयावरील परिसंवादात सचिन परब, मुक्ता दाभोळकर, श्रीकांत देशमुख, गणेश विसपुते, डॉ. शिवाजीराव जवळगेकर सहभागी होणार आहेत. रात्री प्रफुल्ल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी १८ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकोचित होत चालल्या आहेत काय?’ या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, प्रा. आनंद मेनसे, किशोर बेडकीहाळ, कपिल पाटील, वैशाली पाटील, रमेश गावस सहभागी होणार आहेत. दुपारी १२.३० वाजता या संमेलनाचा समारोप सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)परिसंवाद, चर्चासत्रांना मान्यवरांची उपस्थितीडॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या समारंभाला कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. राजन गवस, किरण ठाकूर, जयानंद मठकर, प्रा. आनंद मेनसे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात माया पंडित, डॉ. रणधीर शिंदे, प्रा. नितीन रिंढे, डॉ. आसाराम लोमटे, प्रा. उदय लोटे, डॉ. सुनील भिसे, राजा शिरगुप्पे, सचिन परब, मुक्ता दाभोळकर, श्रीकांत देशमुख, गणेश विसपुते, डॉ. शिवाजीराव जवळगेकर प्रफुल्ल शिलेदार, डॉ. अशोक चौसाळकर, माजी कें द्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, प्रा. आनंद मेनसे, किशोर बेडकीहाळ, कपिल पाटील, वैशाली पाटील, रमेश गावस सहभागी होणार आहेत.
अण्णाभाऊंच्या साहित्यावर चचा
By admin | Updated: January 9, 2015 00:02 IST