शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 14:02 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परंतु सद्यस्थिती पाहता अचानक नैसर्गिक आपत्ती आल्यास खूप मोठे नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन तसेच वैशिष्ठयपूर्ण असे नियोजन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज !सामाजिक संघटनांचे सहकार्य महत्वाचे !

सुधीर राणेकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परंतु सद्यस्थिती पाहता अचानक नैसर्गिक आपत्ती आल्यास खूप मोठे नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन तसेच वैशिष्ठयपूर्ण असे नियोजन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.एखादी आपत्ती आली तर त्यातून वाचण्यासाठी तत्कालीक उपाययोजना केल्या जातात. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मोठया नुकसानीला सामोरे जावे लागते . वेळप्रसंगी काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. हे नुकसान कधीही भरून येणारे नसते. त्यामुळे भविष्यात दुर्दैवी घटना घडण्याअगोदरच त्या होऊ नयेत, यासाठी शासनाने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.देशातील व राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड करणे, जास्तीत जास्त संभाव्य पूररेषा निश्‍चित करून तेथील नागरिकांचे स्थलांतर करणे, धोकादायक संभाव्य पूररेषेच्या जवळपास संरक्षक भिंत उभारणे, नदीजोड झाल्यावर प्रमुख धरणांतील पाणी विसर्ग व व्यवस्थापन यासाठी केंद्रीय स्तरावर मुख्य समिती व त्याअंतर्गत राज्य पातळीवरील, जिल्हा व तालुकास्तरावर समिती असावी. त्यांच्यामार्फत पाणी व्यवस्थापन, धरण सुरक्षितता, धरणगळती झाल्यानंतरही पुढे मोठा धोका होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधणे, धरणातील पाणीगळती, संभाव्य धोक्‍यांबाबत व्यवस्थापन असावे. दुर्दैवाने अशा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या तरी त्यांचा सामना करण्यासाठी शासकीय व्यवस्था व नागरिकांना योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.एखाद्या इमारतीला अचानक आग लागली तर त्यापासून बचाव कसा करायचा ? त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ? इमारती मध्ये जास्त माणसे असतील तर त्यांना सुखरूप बाहेर कसे काढायचे ? त्या व्यक्तींनी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी? चेंगराचेंगरी होणार नाही यासाठी काय उपाययोजना कराव्यात ? याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नागरिकांना अगोदरच देणे आवश्यक आहे. याप्रमाणे सर्व नागरिकांना प्रशिक्षित केल्यास अनेक समस्यांचा सामना करणे सहज शक्‍य होईल.भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा व त्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचा अभ्यास व व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा ही केवळ कागदोपत्री नव्हे, तर सर्वप्रकारे उत्तमरीत्या प्रशिक्षित असणारी यंत्रणा-शासकीय, सांघिक, सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवरही असणे हे क्रमप्राप्तच आहे, किंबहुना आता ही काळाची "गरजच' बनली आहे.सामाजिक संघटनांचे सहकार्य महत्वाचे !आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना शासन देत असताना समाजातील विविध सामाजिक संघटनांना सहकार्याचे आवाहन केल्यास ते महत्वपूर्ण ठरणार आहे. याकामासाठी सांघिक प्रयत्न झाल्यास निश्चितच यश मिळेल.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग