शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:04 IST

संदेश कोलते सावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्दे नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानीविदर्भ, मराठवाड्याच्या धर्तीवर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संदेश कोलतेसावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सरकारकडून नुकसानभरपाईची जरी घोषणा करण्यात आली असली तरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक झाडास वेगळे निकष लावून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील शेतकरी करीत आहेत.सावंतवाडी तालुक्यात पुराचा सर्वाधिक फटका ओटवणे व बांदा परिसराला बसला. यात येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे येथील भातशेती, काजू, माड तसेच पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाईची जरी घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतात न जाता केवळ सातबाराच्या आधारे सरकार भरपाई देणार असल्याचे समजते.ओटवणे, बांदा भागात भातशेतीबरोबर काजू, माड पोफळी, केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भात शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अल्प असले तरी भात शेतीच्या तुलनेत काजू तसेच माडापासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. तर काजू, माड, पोफळी या शेतीच्या लागवडीसाठी येणारा खर्च मोठा असून या शेतीपासून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे उत्पन्न मिळते.तसेच् काजू शेतीचा उत्पादन खर्च व नफा भातशेतीच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीपासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हे भिन्न असल्यामुळे सरकारने ठरविलेल्या सरसकट नुकसानभरपाईमुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

सरकारने नुकसान भरपाई देताना अधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून माड, पोफळी, केळी, काजू तसेच भातशेती यांना वेगवेगळे निकष लावून नुकसान झालेल्या प्रत्येक झाडांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.सरकार व लोकप्रतिनिधींनी जरी नुकसानभरपाईची घोषणा केली असली तरी मिळणारी भरपाई अल्प आहे. इथे केली जाणारी शेती ही वेगवेगळी असून एखाद्या काजू कलमांच्या पूर्ण वाढ करण्यासाठी पाच वर्षात येणारा खर्च हा दोन ते तीन हजारांच्या घरात आहे. हा खर्च भात शेतीच्या तुलनेत खूपच जास्त असून झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे न करता जर सरकार सरसकट नुकसान भरपाई देत असेल तर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारला द्यायचीच असेल तर प्रत्येक झाडास वेगवेगळे निकष लावून तसे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. भात शेतीच्या निकषावर येथील माड, काजू बागायतदारांना सरकार नुकसान भरपाई देत असेल तर ती सरकारने न दिलेली बरी.संदीप सावंतकाजू, बागायतदार शेतकरीमुसळधार पावसामुळे ओटवणे दशक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर परिस्थितीमुळे येथील केळी बागायतीचे नुकसान झाले आहे. (संदेश कोलते)2 अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग