शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

सिंधुदुर्गसाठी नुकसान भरपाईबाबत वेगळे निकष : दीपक केसरकर

By admin | Updated: May 13, 2017 11:56 IST

पंचनामे दोन दिवसात : नरेगा अंतर्गत तीन ते चार वर्षांची झाडे देणार

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १३ : बांदा ता. सावंतवाडी परिसरात जे चक्रीवादळ झाले त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी फलोद्यान जिल्हा म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेगळे निकष लावण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. ज्या गावात पूर्ण अथवा अंशत: नुकसान झाले आहे तेथील पंचनामे दोन दिवसात करुन नरेगा अंतर्गत तीन ते चार वर्षांची झाडे देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्?ती व्यवस्थापन, वीज पुरवठा व पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर पाटील, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री वेलुकर उपस्थित होते.बांदा परिसरात चक्रीवादळ झाल्यामुळे ज्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या गावात केंद्र शासनाच्या नरेगा योजनेअंतर्गत फळ झाड तसेच खड्डा खणणे आदिसाठी मदत केली जाणार आहे. यासाठीचे पंचनामे दोन दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधीत विभागाकडून या वादळात फळझाडांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.देवगड तालुक्यात कातळ जमिनीमुळे सर्वाधिक पाणी टंचाईचा फटका बसतो. म्हणून या भागामध्ये टंचाई भासणार नाही, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जाईल. यासाठीच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मोंड येथील विहिरीचे सर्वेक्षण,आंबोली सतीची वाडी पाण्याची व्यवस्था, सजेर्कोट येथे आरओ प्लांट बसविण्यासाठी पाहणी करणे याबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्या.पाणी पुरवठ्याच्या किती योजना पूर्ण झाल्या आहेत, किती अपूर्ण आहेत, ठेकेदारांच्या काय अडचणी आहेत, याचा आढावा दर आठवड्याला घेऊन टंचाई अंतर्गत ज्या ठेकेदारांनी कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. विधन विहिरीसाठी जेवढी जागा लागेल तेवढ्याच जमिनीचे बक्षीसपत्र करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा विहिरींची कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आपत्?ती व्यवस्थापनामध्ये ग्रामपातळीवर अंमलबजावणी होते की नाही, शेवटच्या स्तरापर्यंत कर्मचारी सहभागी होतो की नाही याचे सर्वेक्षण करण्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी, वाफोली, बांदा व विलवडे येथे चक्रीवादळामुळे विजेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसात द्यावा व वीज जोडणीची आवश्यक ती कामे तातडीने करून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा असेही त्यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी विजेच्या संदभार्तील सर्व कामे पूर्ण करावीत तसेच वीज गेल्यास ती पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्या गावात वीज गेल्यावर तीन ते चार दिवस येत नाही अशा ठिकाणी विशेष लक्ष्य देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. व ही सर्व कामे १५ जून पूर्वी पूर्ण करावीत यासाठी कामगारांची आवश्यकता भासल्यास तात्पुरत्या कालावधीसाठी कामगार नेमावेत असे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले.