शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांविरोधात ढोल बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:05 IST

Morcha, Collecatoroffice, sindhudurgnews \ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधित हप्तेखोर अधिकार्‍यांवर कारवाई करून जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद करा. आमदार, खासदार झोपलेत काय? जिल्हा चालवतोय कोण? अवैध धंदेवाले का ? असा प्रश्न केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सावंतवाडी नागरी कृती समिती आक्रमक

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधित हप्तेखोर अधिकार्‍यांवर कारवाई करून जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद करा. आमदार, खासदार झोपलेत काय? जिल्हा चालवतोय कोण? अवैध धंदेवाले का ? असा प्रश्न केला.नागरी कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात हरी गावकर, अमोल साटेलकर, श्यामसुंदर आजगावकर, शकुंतला पणशीकर, लता चव्हाण, एल. एस. निचम आदी विविध संघटनांचे पधाधिकारी सहभागी झाले आहेत.या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनातून त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे हप्तेखोर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ते अधिक मिळत असल्याने जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे.शासनाने बंदी घातलेला गुटखा, गोवा बनावटीची विषारी दारू, अमली पदार्थ याची विक्री आणि तस्करी राजरोसपणे सुरू आहे. अवैध व्यवसायात अल्पवयीन मुलांसहीत तरुण-तरुणी सहभागी होऊन अमली पदार्थांचे शिकार होत आहेत. भेसळयुक्त विषारी दारूमुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

जिल्ह्यातील महिलांना विधवा व मुलांना अनाथ बनविण्याचा कारखाना जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्यांनी लाचखोर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने चालविला आहे, असा आरोप केला आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग