शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

देवगड किनारा पर्यटकमय सुट्टीचा हंगाम : विविध भागातून पर्यटक दाखल, अधिक सुविधांची गरज

By admin | Updated: May 18, 2014 00:25 IST

नरेंद्र बोडस ल्ल देवगड देवगड पुळण म्हणजेच देवगडचा समुद्रकिनारा लांबीने जास्त नसला तरी अत्यंत आकर्षक आहे. एका बाजूला पवनचक्की व

नरेंद्र बोडस ल्ल देवगड देवगड पुळण म्हणजेच देवगडचा समुद्रकिनारा लांबीने जास्त नसला तरी अत्यंत आकर्षक आहे. एका बाजूला पवनचक्की व त्याठिकाणी जाण्यासाठी खास बनवलेली रुंद घाटी व दुसर्‍या बाजूला देवगड बंदर, देवगड किल्ला व गणेश मंदिर याखेरीज राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे व अत्याधुनिक असे रडार व त्यावरील संवेदनक्षम व प्रभावी कॅमेरा यंत्रणा अशा नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टींनी ही पुळण अक्षरश: हजारो पर्यटकांनी या हंगामात फुलून गेलेली आहे. देवगडमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे एकावेळी ५० ते १०० पर्यटकांची एकाच ठिकाणी राहण्याची सोय नसणे ही आहे. त्यामुळे एक बस भरून आलेले पर्यटक खिरापतीसारखे ठिकठिकाणी वाटून त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करावी लागते. त्यासाठी एकाच निवासी संकुलाने २५ ते ३० खोल्यांची सोय असणारी किमान तीन ते चार निवासी संकुले असणे अत्यंत गरजेचे आहे. या सुविधेअभावी पर्यटक मोठ्या बसेस घेऊन येथे येतात. परंतु राहण्यासाठी व रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना कणकवली, मालवण, ओरोस, कुडाळ आदी ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या क्षेत्रात व निवासी संकुले व त्यामधील खोल्यांची संख्या यामध्ये भरीव गुंतवणूक खासगी तत्वावर त्याचप्रमाणे एमटीडीसीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेद्वारेही होणे आवश्यक आहे. सध्या कातवण येथे एमटीडीसीचे ३७ खोल्यांचे संकुल अजूनही प्रलंबित आहे. बांधकामही पूर्ण झालेले नाही. निधीअभावी हे काम रखडलेले आहे. त्यामध्ये सुधारणा होऊन हे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. देवगड किनार्‍यावर खासगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बसण्यासाठी चांगली मजबूत व आकर्षक आसन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची पसंतीही सूर्यास्तसमयी या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी मिळत आहे. याठिकाणी ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून तात्पुरती खानपानसेवा देणारी शेड किंवा स्टॉल उभारून पर्यटकांना चांगली सेवा देऊ शकेल व त्यामुळे वर्दळही वाढू शकेल. याठिकाणी स्मशान असल्याने त्याभोवती मोठी भिंत बांधून दिल्याने बहुतेक पर्यटकांसाठी एक मानसिक आश्वासतेचे आहे. याठिकाणीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन होते. त्यामुळे लोकांचे हे आकर्षण स्थान या आधीच बनलेले आहे. आता पायाभूत सुविधांअंतर्गत सुलभ शौचालय व विश्रांतीस्थान यांची गरज अजूनही पूर्ण झालेली नाही. पाण्याची व्यवस्था व सुलभ शौचालय यांची निर्मिती यामुळे पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. देवगड पुळणीभोवती फिरून पुन्हा साटमवाडीमार्गे मुख्य रस्त्यावर येणारा रस्ता उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या आकर्षणात भर पडलेली आहे व त्याचा फायदा पुढील काळात दिसणार आहे.