शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास

By admin | Updated: June 6, 2016 00:41 IST

दीपक केसरकर : तारकर्ली येथे पर्यटन धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक

मालवण : बोटिंग आणि जलक्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी लवकरात लवकर खाड्यांतील गाळ काढला जाणार आहे. गावागावांतील खाड्या विकसित होण्यासाठी ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास केला जाणार आहे. केरळच्या धर्तीवर जिल्ह्याचा पर्यटन विकास होण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.तारकर्ली येथे इसदाच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे पर्यटन धोरणाबाबत येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाची भूमिका याबाबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मेरीटाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, बंदर विभागाचे कॅप्टन इंगळे, अमोल ताम्हणकर, नितीन वाळके, महेश जावकर, बबन शिंदे तसेच बंदर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत अनुपस्थित होते. किल्ला होडी सेवा वाहतुकीसाठी निश्चित केलेली हंगाम बंदची तारीख यापुढे पावसाळी वातावरणावरच निश्चित करण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. स्थानिक युवकांना साहसी जलपर्यटनाचे शासनातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात बंदरांच्या विकासाची जबाबदारी मेरीटाईम बोर्डाकडे सोपवलेली आहे. यासाठी आवश्यक ठिकाणी जेटीची उभारणी, प्रमुख बंदरे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रमुख बंदरे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या मेरीटाईम बोर्डाला सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच साहसी जलक्रीडा प्रकारांच्या परवान्यांबाबत एक शिबिराचे आयोजन करण्यात येईल. या शिबिरातून बोटींचे परवाने वितरित करण्यात येतील, असे मेरीटाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना खडेबोल आणि आभारहीसभेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आणि सभेला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ माझ्यावर आणू देऊ नका, असे खडेबोल सुनावत त्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. तर रात्री नऊ वाजता सुरू झालेली बैठक साडेअकरा वाजेपर्यंत सुरू होती. उशिरा बैठक सुरू होऊनही पालकमंत्र्यांनी आभारही मानले.