शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मालवणच्या हितासाठीच विकास आराखडा हवा

By admin | Updated: September 3, 2015 23:28 IST

वैभव नाईक : बसस्थानक येथील वॉटर फिल्टरचेही लोकार्पण

मालवण : शहर विकास आराखडा कोणत्याही परिस्थितीत जनतेवर लादला जाणार नाही. आराखडा इंग्रजीमधून असल्याने मराठीत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार आहेत. मात्र, नगरपरिषद तसेच शासनाने बिल्डर लॉबी व आर्थिक लागेबांधे न पाहता हरकती नोंदवून घ्याव्यात. जनतेच्या मतानुसार विकास आराखड्यात बदल करण्यासाठी शिवसेना शहरवासीयांच्या पाठीशी राहून हरकती नोंदविण्यासाठी सहकार्य करणार आहे, अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी बोलताना स्पष्ट केली. गत महिन्यातील आपल्या मालवण दौऱ्यात त्यांनी एस. टी.स्थानक परिसराला भेट दिली होती. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न लक्षात येताच स्वखर्चातून बसवलेल्या वॉटर फिल्टरचे लोकार्पण माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक अजय पाटील उपस्थित होते. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नंदू गवंडी, नगरसेविका सेजल परब, रविकिरण आपटे, सन्मेश परब, दीपा शिंदे, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, चारुशीला आचरेकर, मेघा सावंत, श्रीराम गावकर, प्रमोद राणे, प्रवीण लुडबे, बाबू मांजरेकर, किशोर गावकर, सुधीर चिंदरकर, किरण वाळके, पराग खोत, सोमनाथ लांबोर उपस्थित होते. नाईक म्हणाले, शहरवासियांचा विचार न करता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर जनतेसाठी हरकती घेण्यासाठी दिलेली मुदतही अपुरी आहे. ती मुदत वाढवून मिळण्यासाठी, तसेच आराखडा मराठीत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा आराखडा मराठीत असला तर त्यावर हरकती मांडणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)बंदर जेटीचे सुशोभिकरण होणारमालवण बंदर जेटीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. स्थानिक होडी चालक व व्यावसायिक मच्छिमार यांना विश्वासात घेऊन अद्ययावत जेटी बनवली जाणार असून, सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा आराखडा बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी होडी व्यावसायिकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील पंचधातू ध्वजाची नव्याने उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान, किल्ले होडी सेवा पर्यटन हंगाम सुरु झाला तरी बंदर विभागाची आयव्ही तपासणी न झाल्याने रखडली आहे. याबाबत प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांची चर्चा करून तपासणी होईपर्यंत या व्यावसायिकांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई नकोदेवबाग तारकर्ली येथील अनधिकृत बांधकामांवर महसूलने फौजदारी गुन्हे दाखल केले. याबाबत पोलिसांचे पंचनामे सुरु झाले आहेत. असे असले तरी एकाही स्थानिक व्यावसायिकांवर शहानिशा केल्याशिवाय कारवाई होणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.