शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

कणकवलीचा ब्ल्यू प्रिंटनुसार विकास सुरु

By admin | Updated: March 30, 2016 23:51 IST

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांची माहिती : आम्ही जनतेचे सेवक, शहरात कोट्यवधीची विकास कामे

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५0 दिवसात अनेक विकास कामे आम्ही मार्गी लावली आहेत. शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही मनात तयार केली असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. जनतेचे मालक न होता सेवक बनूनच यापुढेही आम्ही काम करीत राहणार असल्याचे नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत येथे संगितले.येथील नगरपंचायतीच्या कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, विरोधी पक्ष नेत्या राजश्री धुमाळे, नगरसेवक सुशांत नाईक, नंदिनी धुमाळे, प्रा. दिवाकर मुरकर उपस्थित होते.नगराध्यक्षा माधुरी गायकवाड म्हणाल्या, शहरवासीयांकडून नुसते कर न घेता त्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील २८ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे बाजारपेठ, तेलीआळी, जानवली नदीवरील गणपती सान्यापर्यंत जाणारा रस्ता या तीन रस्त्याची कामे दर्जेदाररित्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे रस्ते पुढील काळात आदर्श मॉडेल म्हणून शहरवासियांसमोर असतील. त्याच धर्तीवर अन्य रस्ते बनविण्यात येतील. बीटीमीन्स पध्दत हे रस्ते बनविताना वापरण्यात येणार आहे.नगरोत्थान अभियानामधुन शहरासाठी यावर्षी ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीअंतर्गत पाठविण्यात आलेल्या कामाच्या प्रस्तावाना मंजुरी मिळाली आहे. ही कामे अल्पावधितच सुरु होतील. संपूर्ण शहराचा विचार करून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा चांगल्यारीतीने होऊ शकेल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जॅकवेलचा १५ वर्षाचा कालावधी असून आता १३ वर्षे झाली आहेत. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्यात येणार आहेत. तर जास्त क्षमतेचे दोन पंप ही बसविण्यात येणार आहेत. या अद्ययावत पंपामुळे पाणी उपसा करण्याचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे विज देयक ही कमी येणार आहे. नागरिकांनी अर्ज केल्यावर लगेचच त्यांना नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून जानवली नदीवरील गणपती साना पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी सरंक्षक भिंत उभारण्याबरोबरच सी.सी.टी.व्ही. ही बसविण्यात येईल. तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.कचराविरहित रस्ता व शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन संकुल बांधण्यास परवानगी देताना सांडपाणी फिल्टरेशन प्लांट बसविणे, कचरा व्यवस्थापन करणे या अटी घालूनच परवानगी देण्यात यावी असे मुख्याध्याकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार असून जॉगिंग ट्रॅक सारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. यासाठी कांबळेगल्ली येथील आरक्षण विकसित केले जाणार आहे. शहर विकासासाठी आतापर्यंत विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक तसेच नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले असल्याचे कन्हैया पारकर यांनी शेवटी सांगितले. (वार्ताहर)जागा द्या ! पैसे देऊ !शहरातील विकास कामासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. विकास कामासाठी जागा द्या ! आम्ही पैसे देऊ ! हे आमचे धोरण आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्यांना नगरपंचायतीच्या माध्यमातून मोबदला देण्याची जबाबदारी आमची आहे, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी यावेळी सांगितले.शहराचा विकास जलदगतीने सुरु !आमचे मार्गदर्शक संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणाचाही राजकीय वरदहस्त नसताना चांगले काम सुरु आहे. यापूर्वी संदेश पारकर यांच्या हाती नगरपंचायतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली होती. त्याहूनही अधिक कामे आता अल्पावधित आम्ही केली आहेत. शहराचा विकास जलदगतीने सुरु आहे, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी सांगितले.पालकमंत्री तसेच शासनाचे आभार !कणकवलीच्या विकासासाठी युती शासनाने तसेच पालकमंत्र्यानी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कणकवलीच्या इतिहासात प्रथमच एवढा निधी उपलब्ध झाला असेल. त्यामुळे त्यांचे आभार मानत असल्याचे नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी यावेळी सांगितले.