शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण विरहित शहराचा विकास करा

By admin | Updated: December 25, 2016 23:36 IST

संदेश पारकर : मालवण नगराध्यक्ष पदग्रहण व शपथविधी सोहळा; मालवणी भाषेत नगराध्यक्षांना शुभेच्छा

मालवण : मालवणला शिवकालीन ऐतिहासिक आणि वैभवशाली पार्श्वभूमी लाभली आहे. पालिका निवडणुकांत मालवणच्या जनतेने पंधरा वर्षांनंतर सत्ता परिवर्तन घडवित शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल दिला. नगराध्यक्ष पदावरही जनतेने सक्षम नेतृत्त्वाला संधी दिली आहे. महेश कांदळगावकर व त्यांच्या सतराही शिलेदारांवर अपेक्षित विकास करण्याची मोठी जबाबदारी आहे. मालवणात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची, कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेत असतो. त्यामुळे जनता आणि प्रशासन यांचा समन्वय साधून शहरातील प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पक्षीय राजकारण न करता सर्व नगरसेवकांनी पदाला योग्य न्याय द्यावा, असे प्रतिपादन भाजप नेते संदेश पारकर यांनी केले.मालवणचे नूतन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा पदग्रहण समारंभ पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात पार पडला. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात भाजप नेते संदेश पारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समारंभाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, भाजपचे विलास हडकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, नगरसेवक राजन वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा करलकर, सेजल परब, पंकज साधये, शीला गिरकर, दर्शना कासवकर, ममता वराडकर, यतीन खोत, पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनिता जाधव, श्वेता सावंत, देवयानी मसुरकर, रश्मी परुळेकर, दीपा शिंदे, रविकिरण आपटे, गोपी पालव, विजय केनवडेकर, बबलू राऊत, जगदीश गावकर, अवधूत मालोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष दालनात कांदळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार भाई गोवेकर व संदेश पारकर यांच्या हस्ते स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक नितीन वाळके यांनी केले. यावेळी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांनी कांदळगावकर यांना ‘नगराध्यक्ष नयो, सुशिक्षित व्हयो’ या मालवणी कवितेतून शुभेच्छा देत शहरातील समस्या व रखडलेल्या योजनांबाबत मार्मिक शब्दात प्रकाश टाकला. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मालवणी बोलीभाषेतून व्यासपीठावर तुफान फटकेबाजी करत आव्हानाला सामोरे जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कांदळगावकर यांनी पाच वर्षात चांगले काम केल्यास निवडणुकीपूर्वी नागरिक स्वत: त्यांची मिरवणूक काढतील, असे सांगितले. विनायक कोळंबकर यांनी समस्या मांडताना मालवणवासियांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बाबा मोंडकर यांनीही क्रीडा शैलीत भाषण केले. राजकारणात टिकायचे असल्यास थर्ड अंपायर जनताच असते, असे ते म्हणाले. माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर व जॉन नऱ्होना यांनीही यावेळी विचार मांडले. (प्रतिनिधी)नगरसेवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावाभाई गोवेकर म्हणाले, शहरात भुयारी गटार योजना, शहर विकास आराखडा, डास निर्मूलन यांसारख्या असंख्य समस्या आजही प्रलंबित आहेत. या समस्या सोडविण्यासाठी जनतेने नगराध्यक्ष म्हणून कांदळगावकर यांना निवडून दिले आहे. त्यामुळे पदग्रहण सोहळ्यात नागरिकांनी दिलेले पुष्पगुच्छ हे समस्यांचे पुष्पगुच्छआहेत. जनतेच्या समस्यांची जाण ठेवून राजकारण विरहित शहराचा विकास करण्यास कटिबद्ध रहा. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा न लावता नगरसेवकांनी विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शक कारभार करेन४महेश कांदळगावकर यांनी पदग्रहण सोहळ्यात शहरवासियांसमोर शपथविधी घेत जनतेला केंद्रस्थानी ठेवले. स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शक कारभार करेन. जनतेला अभिप्रेत काम करताना गटातटाचे राजकारण व कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक निर्णय घेईन. कोणताही निर्णय जनतेवर लादणार नाही. सुखसोयींनीयुक्त असे आदर्श शहर बनविणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल, असे कांदळगावकर यांनी शपथविधीत म्हटले.