शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

आधी आश्वासने आता दरात येऊनही अधिवेशनाकडे पाठ, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण मंत्र्यांवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 17:28 IST

सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षात आमचे प्रश्न ऐकून घेतले पण सोडवले नाहीत पंधरा दिवसापूर्वी शिक्षकेतर ...

सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षात आमचे प्रश्न ऐकून घेतले पण सोडवले नाहीत पंधरा दिवसापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतो असे  पुन्हा आश्वासन दिले. परंतु त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे दुसरीकडे मागून मिळत नाही घरी आल्यानंतर तरी देतात का नाही ते बघूया म्हणून आम्ही त्यांच्या दारात येवून अधिवेशन घेण्या

चा निर्णय घेतला. परंतु तेच आले नाहीत, अशा शब्दात आपली नाराजी राज्य संघटनेचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी अधिवेशनात बोलून दाखवली सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर रविवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी अधिवेशनाला आमदार विक्रम काळे सह आमदार निरंजन डावखरे आदिनी भेट दिली तर उद्योजक विशाल परब अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या अधिवेशना ला राज्यभरातून पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आले होते.

खांडेकर म्हणाले,मंत्री केसरकर यांनी आम्हाला दिलेली आश्वासने अर्धवट ठेवली. मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमतः आपण प्रश्न समजून घेतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षभर आम्ही गप्प राहिलो. परंतु आता कारकीर्द संपण्याची वेळ आली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला नाराज केलात तर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्राचे आर्थिक गणित कोलमडेल असे काही मागत नाही. बारा, चोवीसचा प्रश्न किंवा दहा, वीस, तीसचा प्रश्न सोडवण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. याबाबत मंत्री केसरकर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन दिले होते. तसेच पंधरा दिवसात हे दोन्ही प्रश्न आपण सोडवतो, तसा शासन अध्यादेश काढतो, असे आश्वासन दिले होते. परंतु या घटनेला अनेक महिने उलटले तरी अद्याप पर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे किमान त्यांच्या घरी गेल्यानंतर तरी ते देतील असे वाटल्यामुळे आम्ही सावंतवाडीत अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आजच्या अधिवेशनात ते आले नाहीत.अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

आमदार काळे यांनी  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीची भरती नको, तर पूर्णवेळ पदे भरा. त्यांना म्हातारपणाची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना आधार द्या, असे आवाहन काळे यांनी केले तर आमदार निरंजन डावखरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे, असे स्पष्ट केले.तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न मोठे ते सोडवले गेले पाहिजेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर