शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

आयुष्यमान भारत योजनेपासुन खरे लाभार्थी वंचित, यादीत धनदांडग्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:58 IST

केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवुन खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र ही योजना राबवित असताना सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांनी धनदांडगे आणि सरकारी नोकर तसेच सफेद रेशनकार्ड असणार्‍यांचा समावेश करुन दारिद्र्यरेषेखालील नागरीकांना त्याचप्रमाणे पिवळ्या व केशरी कार्डधारकाना या योजनेपासुन वंचित ठेवण्याचे काम केले आहे. याबाबतचा बोगस सर्व्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी शासनाजवळ आमची मागणी असल्याचे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यानी सांगितले.

ठळक मुद्देआयुष्यमान भारत योजनेपासुन खरे लाभार्थी वंचित, यादीत धनदांडग्यांचा समावेशनगराध्यक्ष समीर नलावडे यानी मांडली भुमिका

कणकवली : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवुन खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र ही योजना राबवित असताना सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांनी धनदांडगे आणि सरकारी नोकर तसेच सफेद रेशनकार्ड असणार्‍यांचा समावेश करुन दारिद्र्यरेषेखालील नागरीकांना त्याचप्रमाणे पिवळ्या व केशरी कार्डधारकाना या योजनेपासुन वंचित ठेवण्याचे काम केले आहे. याबाबतचा बोगस सर्व्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी शासनाजवळ आमची मागणी असल्याचे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यानी सांगितले.कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरपंचायत गटनेते तथा बांधकाम सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडु गांगण उपस्थित होते.यावेळी समीर नलावडे म्हणाले, या योजनेसाठी सर्व्हे करताना नगरपंचायतीला विश्वासात न घेता केल्याने खरे लाभार्थी मात्र योजनेपासुन वंचित राहीले आहेत. तर धनदांडग्यांचा या यादी मध्ये समावेश झाला असल्याने याबाबत आपण जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असुन ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधणार आहे.तसेच राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेप्रमाणेच आयुष्यमान भारत योजनेतही पिवळ्या व केशरी कार्डधारकांचा समावेश व्हावा ही आपली मागणी असल्याचे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबतचा दृष्टीकोण हा फारच चांगला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र या योजनेची यादी बनविताना शासनस्तरावर निर्माण झालेल्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे.

कणकवली शहरातील धनदांडग्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. दारीद्ररेषेखालील यादीचा सर्व्हे २००५-०६ मध्ये झाला. त्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने २०१० साली एसईसीसी (सोशल इकॉनॉमिक्स कास्ट सर्व्हे) करण्यात आला. हा सर्व्हे करताना नगरपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. वास्तविक आयुष्यमान भारतच्या या यादीत दारीद्ररेषेखालील सर्व कुटुंबाचा समावेश होणे बंधनकारक होते. परंतु प्रत्यक्षात मात्र काही कुटुंबांची नावे वगळण्यात आली आहेत. २०१० सालच्या यादीत कणकवली शहरातील धनदांडगे, व्यापारी, व्यावसायीक आणि शासकीय कर्मचारी त्याचप्रमाणे अधिकार्‍यांची कुटुंबे यांचाही समावेश आहे. त्यामुळे ज्याला लाभ मिळायला हवा होता त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळताना दिसत नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.कणकवली शहरात एकुण ९४७ कुटुंबांचा या यादीत समावेश आहे. म्हणजेच कणकवली शहरातील जवळपास ३५०० नागरीकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु ही यादी सदोष असल्याने खरे लाभार्थी योजनेपासुन वंचितच राहीले असल्याचे सांगताना समीर नलावडे म्हणाले, डॉ.अविनाश पाटील हे या योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन काम पाहत आहेत.

ही यादी करताना ७ प्रकारच्या अटींचा अभ्यास केल्याचे सांगण्यात येते. मग या यादीत धनदांडग्यांची नावे कशी आणि खरे लाभार्थी कसे वगळले गेले असा सवाल करताना ते म्हणाले, सर्व्हे करणार्‍यांनी घरात बसुन ही यादी केली नाहीना ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेला आमचा विरोध नाही मात्र ज्या संस्थेने अथवा कर्मचार्‍यानी ही यादी बनविली होती त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे अन्यथा खर्‍या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणारच नाही असेही समीर नलावडे यानी स्पष्ट केले.महात्मा फुले योजनेप्रमाणे लाभ द्या !राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजना अंमलात आणली. या योजनेत पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला दिडलाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार उपलब्ध होतात. राज्य सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना गृहीत धरुन ही योजना राबविली असताना आयुष्यमान भारतच्या यादीत घोळ कसा असे सांगताना समीर नलावडे म्हणाले, महात्मा फुले ज्योतिबा फुले आरोग्य योजनेप्रमाणे आयुष्यमान भारत योजनेतही पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांचा समावेश करावा . त्याचप्रमाणे दारीद्ररेषेखालील नागरीकाना या योजनेचा लाभ मिळावा ही आपली मागणी असल्याचे ते यावेळी म्हणाले.संबंधितांची तक्रार करणार !आयुष्यमान भारत योजनेबाबत खरे लाभार्थी वंचित राहुनये यासाठी आणि सर्व्हे करणार्‍यानी केलेल्या चुकीमुळे खर्‍या लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे ट्टिटरच्या माध्यमातुन पंतप्रधानांचे लक्ष वेधणार असल्याचे यावेळी समीर नलावडे यानी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकार