शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

देवगड-निपाणी राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Updated: August 8, 2016 23:35 IST

फोंडा बाजारपेठेत १-१ फुटाचे खड्डे : वाहतुकीची कोंडी कायम; प्रशासन मात्र सुस्तच

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले फोंडाघाट हे गाव. ऐतेहासिक बाजारपेठेचा वारसा असलेल्या या बाजारपेठेतून जिल्ह्यातील इतर गावांना मालवाहतूक केली जाते. सोमवार आठवडा बाजार असला तरी शनिवारी रात्रभर या गावात पान बाजार चालतो. संपूर्ण जिल्ह्यातील पानांचे व्यापारी एकत्र या बाजारासाठी येतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची ओळख असणारा ‘मध’ याच गावाचे नाव उज्ज्वल करतो. मात्र, सध्या याच ऐतिहासिक गावातील नागरिकांना अनेक समस्यांनी भेडसावले आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ता, वाहतूक व खड्डे होय. देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलेली ही फोंडाघाटची ऐतिहासिक बाजारपेठ असंख्य खड्ड्यांमुळे चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम झाल्यानेच या बाजारपेठेत तब्बल १-१ फुटांपेक्षा मोठे खड्डे या राज्यमार्गावर पडल्याचे ठिकठिकाणी दिसताहेत. याकडे स्थानिक पदाधिकारी व बांधकाम विभाग पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे होत असलेली वाहतुकीची कोंडी व बाजारपेठेत असलेले भलेमोठे खड्डे यामुळे पादचारी व वाहन चालकांमध्ये प्रशासनविरोधात तीव्र नाराजी आहे. या बाजारपेठेतच एका निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्याला वाहतुकीच्या कोंडी दरम्यान गंभीर इजा झाली होती. त्यानंतर एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा मालवाहू ट्रकची धडक लागून मृत्यू झाला होता. अशा गंभीर घटना घडूनही बांधकाम विभागाने याबाबत गंभीर दिसत नाही. येथील रस्ता रुंदीकरणाच्या व वाहतूक कोंडीच्या विषयात बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. मागील काही माहिन्यांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांना याच बाजारपेठेतून जात असताना तब्बल एक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तत्काळ त्यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरत फोंडाघाट बाजारपेठ रुंदीकरणाच्या सूचना दिल्या. तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी तातडीने फोंडाघाट बसस्थानकानजीकचे अतिक्रमण हटवत पुलाची रुंदी वाढवून घेतली. मात्र, एखाद्या नाटकावर पडदा पडावा तसा पालकमंत्र्यांची पाठ फिरताच या रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर पडदा पडला व रस्ता रुंदीकरण फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले. पोलिसांचे कर्तव्य फोंडा आय.टी. आय.पर्यंतच? वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच कोल्हापूर ते फोंडा अंतर ३ तासात पार व्हावे यासाठी वाहन चालकाला ५ मिनीटांची बाजारपेठ पार करायला तासन तास वाट पहावी लागते. त्यामुळे इथल्या व्यापारावर देखील याचा परिणाम होतो. स्थानिक ग्रामस्थ तसेच काही लोकप्रतिनिधींनी वाहतूक पोलिस मिळावा यासाठी कणकवली पोलिसांकडे वारंवार मागणी केली होती. पण अपुरेकर्मचारीचे कारण सांगत एकही वाहतूक पोलिस दिला नाही. केव्हातरी वाहतूक पोलिस येतात तेही ४ ते ५ जणांच्या गटाने मात्र बाजार पेठेच्या अलीकडे १ किलोमीटर असलेल्या आय.टी. आय.पर्यंत तेही माल, चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पावती करण्यासाठी कधी कधी तर बाजारपेठ पार करून जायची असेल आणि बाजारत वाहतुकीची कोंडी होत असेल तर हे वाहतूक पोलिस मागील रस्त्याचा वापर करतात. मात्र वाहतुकीची शिस्त लावण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत नासल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. गणेशाच्या आगमनापूर्वीच ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे काही दिवसांवर आलेल्या चतुर्थी सणापूर्वी रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करावी कारण श्रींच्या मूर्तींची वाहतूक होताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच मुंबई-पुणे येथून येणारे चतुर्थी सणात येणारे चाकरमानी फोंडाघाट मार्गाला जिल्ह्यात येण्यास पसंती देतात. मात्र प्रवेश द्वारापाशीच असलेल्या या गावात होत असलेली वाहतूक कोंडीकडे गांर्भीयाने पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.