शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतीवर देवबागचे नाव देऊ नये

By admin | Updated: December 16, 2014 23:42 IST

मोहन केळुसकर : तारकर्ली-देवबाग लोकप्रतिनिधी एमटीडीसी अधिकारी बैठक

मालवण : येथील आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग सेंटर हे तारकर्ली गावच्या हद्दीत येते. या सेंटरच्या नामफलकावर देवबाग गावचे नाव संयुक्तपणे लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नामफलकाच्या वादावर तारकर्लीचे लोकप्रतिनिधी उपस्थित नसतानाही तहसीलदारांनी बैठक घेतली. या बैठकीत घेण्यात आलेल्या संयुक्त नावाच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. तारकर्ली गावच्या हद्दीत असणाऱ्या कोणत्याही शासकीय इमारतीवर देवबाग गावचे नाव नकोच असे मत तारकर्ली सरपंच मोहन केळुस्कर यांनी व्यक्त केले.मंगळवारी स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलक वादाबाबत तारकर्ली गावच्या शिष्टमंडळाने तहसीलदार वनिता पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच किशोर कुबल, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, रामचंद्र कुबल, गजानन कुबल, सागर चव्हाण, दिगंबर मालंडकर, राजू मेस्त्री, डॉ. जितेंद्र केरकर आदी उपस्थित होते. तहसीलदार वनिता पाटील यांना स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली गावाचाच उल्लेख असावा या संदर्भात निवेदन देण्यात आले.स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामांतर वादावर तहसीलदार वनिता पाटील यांनी तारकर्ली-देवबाग गावचे लोकप्रतिनिधी एमटीडीसी अधिकारी आदींची संयुक्त बैठक घेतली होती. बैठकीला तारकर्ली गावचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. तारकर्ली येथील सर्व्हे नं. ५९, ६० या जमिनीमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटरची इमारत उभारली. या ठिकाणी तारकर्ली ग्रामपंचायत घर नं. ४५२ आणि ४५३ या नावाने नोंद असलेली बांधकामे शासकीय मासळी आवार म्हणून तारकर्ली ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहेत. ही मालमत्ता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे हस्तांतरीत केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यासाठी तारकर्ली ग्रामपंचायतीने ठरावाने परवानगी दिली आहे. तसेच या इमारतीसाठी लागणारे सर्वप्रकारचे ना हरकत दाखले तारकर्ली ग्रामपंचायतीने दिले आहेत. असे असतानाही स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या इमारतीवर तारकर्लीबरोबर देवबाग नाव लावणे चुकीचे आहे. या नामफलकाबाबत आमची मागणी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांजवळ मांडली असताना या सेंटरच्या नामफलकावरील तारकर्ली नाव देवबागच्या काही ग्रामस्थांनी अनधिकृतपणे काढून वाद निर्माण केला आहे. त्यामुळे यापुढे स्कुबा डायव्हिंग सेंटरवर देवबागचा उल्लेख करण्यात येवू नये असे सरपंच मोहन केळुस्कर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)संयुक्त नावाचा निर्णय चुकीचाआमची बाजू जाणून घेतल्याशिवाय स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलकावर तारकर्ली-देवबाग या दोन्ही गावांचा संयुक्तपणे उल्लेख करण्याचा निर्णय घेण्यात आला. परस्पर घेण्यात आलेला हा निर्णय चुकीचा आहे. तारकर्ली देवबाग असे संयुक्त नाव न लावता केवळ तारकर्ली गावाच्या नावासाठी आम्ही ठाम आहोत. अन्यथा वेगळ्या पर्यायाचा विचार झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा इशारा सरपंच केळुस्कर यांनी दिला.