शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना सील करण्याची मागणी; नागरिकांच्या आरोग्यास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:27 IST

गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रासायनिक कंपन्या आहेत. शिवाय फार्मा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. तसेच खासगी रुग्णालयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रासायनिक कंपन्या, फार्मा कंपन्या व रुग्णालयातील वेस्टेज मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सध्या गोव्यातील कंपनी व्यवस्थापनासमोर आहे.

ठळक मुद्देमाटणे ग्रामपंचायतींचे तहसीलदारांना निवेदन

दोडामार्ग : आरोग्यास घातक असलेल्या रासायनिक व जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा माटणे भोम येथील कारखाना नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याने तो सील करावा, अशी मागणी आयी व माटणे ग्रामपंचायतींतर्फे तहसीलदारांकडे करण्यात आली. तसे पत्रही प्रशासनास दिले असून त्यासोबत कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी करून घालण्यात आलेली पंचयादी सादर करण्यात आली आहे.

गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रासायनिक कंपन्या आहेत. शिवाय फार्मा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. तसेच खासगी रुग्णालयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रासायनिक कंपन्या, फार्मा कंपन्या व रुग्णालयातील वेस्टेज मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सध्या गोव्यातील कंपनी व्यवस्थापनासमोर आहे. गोव्यातील केमिकल व जैविक कचºयाच्या विल्हेवाटीसाठी तेथील नागरिकांचा विरोध आहे. वाढत्या नागरीकरणामुळे या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तेथील घातक केमिकल, रासायनिक द्रव पदार्थ व इतर जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात आणून रात्रीच्या वेळी त्याची विल्हेवाट लावली जाते.सध्या आयी व माटणे गावांच्या सीमेवरील कृष्णा राघोबा सडेकर यांच्या प्लांटमध्ये हा जैविक कचरा आणून त्याची विल्हेवाट लावली जाते. या प्लांटला माटणे ग्रामपंचायतीने रासायनिक साहित्याच्या टाक्या साफसफाई करण्यासाठी ना हरकत दाखला दिला होता. मात्र, ज्या कामाची परवानगी घेतली त्या व्यतिरिक्त दुसरेच काम केले जात आहे. याठिकाणच्या कचºयात मानवी शरीरास घातक असणारे केमिकल व इतर जैविक कचºयाचा समावेश आहे. हा कचरा रात्री जाळला जातो. मात्र, त्यापासून निर्माण झालेला धूर मानवी आरोग्यास घातक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सर्व प्रकरणाचा उलगडा होणे गरजेचेकचºयाची विल्हेवाट लावतेवेळी साधारण एक किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असेल तर हा प्लांट त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याविरोधात माटणे व आयी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत विरोधाचा एल्गारपुकारला होता. त्याची दखल दोन्ही ग्रामपंचायतींनी घेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आक्षेपार्ह साहित्य, रासायनिक द्रव पदार्थ , प्लास्टिक कचरा, विविध प्रकारची केमिकल पावडर आढळून आली. लगेच पंचनामा करून पंचयादीची प्रत जोडत ही कारखानावजा इमारत सील करण्याची मागणीवजा पत्र तहसीलदारांना देण्यात आले.सिंधुफोटो ०१कारखान्यातील रासायनिक व जैविक कचरा असा टाकण्यात आला आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीkonkanकोकण