शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक

By अनंत खं.जाधव | Updated: November 6, 2024 19:42 IST

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून चांगलेच राजकारण तापले. ऐन निवडणुकीच्या काळात केसरकर यांना उद्देशून ...

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून चांगलेच राजकारण तापले. ऐन निवडणुकीच्या काळात केसरकर यांना उद्देशून लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिंदेसेना आक्रमक झाली आहे. दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? अशा संदेशाचे हे बॅनर लावण्यात आले होते. प्रशासनाकडून तो बॅनर आता हटविण्यात आला आहे.यावरूनच शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘तो’ बॅनर कोणी लावला हे आम्हाला माहित आहे. पोलिसांकडून यावर कारवाई करण्यात यावी. हे बॅनर रात्रीच्या वेळी दरोडेखोर सारखे लावण्यात आला आहे. चोरी छुपे बॅनर लावायची सवय कुणाला आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तरी गप्प बसणार नाही असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी दिला. परब म्हणाले, बॅनर ज्यानी लावले त्याना मी अनेक वर्षे ओळखतो. समोर येऊन लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात अशी बालीशकृत्ये करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे आरोप करावेत त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. यापुढे एकजरी बॅनर लावला तरी पळताभुई थोडी करू, असा इशाराही संजू परब यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024