सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. अनेक शिवसैनिक तसेच केसरकर समर्थक मुंबईसाठी रवाना झाले आहेत. याबाबत केसरकर यांना विचारले असता, माझ्यापर्यंत अद्याप काही आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना-भाजपच्या युतीची मोहोर उमटल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा आज, गुरुवारी दुपारी मुंबईत झाली आणि मंत्रिपदाची नावे पुढे येऊ लागली. त्यात पहिल्यापासूनच केसरकरांचे नाव आघाडीवर होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहेत; पण केसरकर हे अभ्यासू असून, ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीतून आमदार झाले होते. तेव्हा त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती.
दीपक केसरकरांना मंत्रिपदाची लॉटरी
By admin | Updated: December 4, 2014 23:43 IST