शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला

By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2022 18:48 IST

भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा.

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांनी कितीही म्हटले आपण पक्ष बदलले नाहीत तरी त्यांचा इतिहास कोण पुसू शकत नाही. त्यांचे राजकारण हे दगा फटक्याचेच राहिले आहे. भविष्यात ते शिंदे गटाशी ही गद्दारी करतील अशी टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केसरकरांना लगावला. तर, भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा असे आवाहनही यावेळी जनतेला केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.भोसले म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे. यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असेही भोसलेंनी यांनी सांगितले.राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सहकार्य करेल. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते जो घेतील त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू असेही भोसले म्हणाले.शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगून मतदार संघात गेले, तेथे शक्तिप्रदर्शन केले. मात्र सावंतवाडीचे आमदार शिंदे गटात जाऊनही त्यांना शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे आता त्यांची ताकद राहिली नसल्याचा टोलाही भोसले यांनी लगावला. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघातून निवडून येणारा आमदार हा गद्दारी करणार नाही असाच निवडून द्या असे आवाहन भोसले यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर