शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सिंधुदुर्गाची सर्वांगिण प्रगतीकडे वाटचाल : दीपक केसरकर

By admin | Updated: May 2, 2017 12:48 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. ०२ : चांदा ते बांदा, कोकण ग्रामीण पर्यटन, स्वदेश दर्शन, जिल्हा नियोजन समितीचे १६० कोटी रुपयांचा आराखडा याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कृषी, पर्यटन, मत्स्य व्यवसाय क्षेत्रात वेगाने वाटचाल सुरु असून सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगिण प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी उपस्थित होते.पर्यटनाच्या विविध प्रकल्पाद्वारे तसेच काथ्या उद्योगामधून आगामी कालावधीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, महिला बचत गटांसाठी पोल्ट्री, शेळीपालन याच बरोबर चांदा ते बांदा योजनेअंतर्गत खेकडा पालन, कोळंबी संवर्धन या योजनांद्वारेही रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या दरडोई उत्पनात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून या सर्व योजना सहाय्यभूत ठरणार आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस, गृहरक्षक दल, वन विभाग यांच्या महिला व पुरुष दलांनी यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदान दिली.विविध पुरस्कारांचे वितरणमहाराष्ट्र दिना-निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिंधु विकास दूत यामध्ये स. ह. केळकर महाविद्यालय देवगड- प्रथम, लोकनेते दत्ता पाटील मेडीकल कॉलेज वेंगुर्ला- द्वितीय तर तृतीय क्रमांक विभागून कणकवली कॉलेज कणकवली व आनंदीबाई रावराणे आॅर्ट, सायन्स कॉलेज वैभववाडी यांना देण्यात आला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग भारत स्काऊड गाईड पुरस्कार पुढीलप्रमाणे झ्रपद्मजा आंबिये, अंकिता बांदेकर मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी, आदिती मालपेकर, श्रध्दा सावंत विद्यामंदीर हायस्कूल कणकवली, नेहा माहुरे डॉन बास्को ओरोस, महिमा केळुसकर, निशा तारी यांना देण्यात आला.आदर्श तलाठी पुरस्कार पी. डी. लोबो यांना रोख ५ हजार व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट कायार्बाबत पोलिस विभागातील विश्वजीत काईंगडे, प्रभाकर शिवगण, सुरेश वारंग, विजय चव्हाण, अमोल सरंगळे, संजय साटम, विलास कुंभार, नंदकुमार शेटिये या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार- प्रथम क्रमांक दिनानाथ द्वारकानाथ गावडे (मे. रुचिरा फुड), द्वितीय श्रीमती उज्वला आनंदा नलावडे (श्री. दत्त कॉयर इंडस्ट्रीज), जिल्हा क्रिडा पुरस्कार गुणवंत खेळाडू युक्ता प्रमोद सावंत, कुणकेरी ता. सावंतवाडी, श्रीवल्लभ श्रीकृष्ण सावंत कोलगाव ता. सावंतवाडी यांना देण्यात आले तर स्मार्टग्राम पुरस्कार जिल्ह्यातील हुमरमळा ता. कुडाळ, परुळे बाजार ता. वेंगुर्ला, पाटगांव ता. देवगड, आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग, कोळोशी ता. कणकवली, धामापूर ता. मालवण, नापणे ता. वैभववाडी, बांदा व मळगाव ता. सावंतवाडी या ग्रामपंचायतीना देऊन यावेळी गौरविण्यात आले.मुख्य शासकीय ध्वजारोहणापूर्वी सकाळी ७.१० वाजता अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात तर जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ध्वजारोहण समारंभास शासकीय खाते प्रमुख, नागरिक, पत्रकार उपस्थित होते.