शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दीपक केसरकरांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही : संजू परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:30 IST

Dipak Kesarkar News- आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.

ठळक मुद्देदीपक केसरकरांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही : संजू परबआपल्या काळात कितीवेळा राजशिष्टाचार पाळला?

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.ते  सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक उपस्थित होते.नगराध्यक्ष परब म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका जी उद्घाटने करत आहेत, तो सर्व निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेऊ नये. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यावर कोण दडपण आणू शकत नाही. तसेच केसरकर हे राजशिष्टाचाराबाबत सांगत आहेत; पण त्यांनी हा शिष्टाचार आपल्या काळात पाळला होता का? तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यावेळी नगराध्यक्षपदी दीपक केसरकर काही काळ होते. तसेच त्यांचीच सत्ता होती. मग कोणत्या उद्घाटनाला राणे यांंना बोलावले याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे, असेही परब म्हणाले.सावंंतवाडी नगरपालिका आपल्या वेगवेगळ्या निधीतून विकासकामे करीत आहे. पालकमंत्री उदय सामंत हे आपण ११ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांंगतात पण हा निधी त्यांनी दाखवून द्यावा. अद्यापपर्यंत एक रुपयाचा निधीही मिळाला नसल्याचा उच्चार करीत मंत्री सामंत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. आम्ही रितसर पालकमंत्री म्हणून उदय सामंंत तर आमदार म्हणून दीपक केसरकर यांचा निमंत्रणपत्रिकेत उल्लेख केला होता, तसे निमंत्रणही त्यांना दिले होते. पण ते येत नसतील तर आम्ही कार्यक्रम करून घेऊ, असेही परब यांनी सांगितले.

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग