शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:51 IST

ambulance, doctor, sindhdurugnews व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे.

ठळक मुद्देकार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तरुणांचा पुढाकार कांदळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण : व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे.गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी कार्डिॲक रुग्णवाहिका आवश्यक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा दोन रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्यातील ही तिसरी रुग्णवाहिका असून मालवणातील पहिलीच ह्यकार्डिॲकह्ण रुग्णवाहिका आहे.अत्यावश्यक स्थितीत रुग्णवाहिकेत डॉक्टरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या रुग्णवाहिकेतून मालवण शहरात मोफत सेवा दिली जाणार आहे. तर रुग्णाला मालवण शहाराबाहेर अन्य रुग्णालयात नेण्यासाठी माफक दरात सेवा उपलब्ध असेल, अशी माहिती अवधूत परुळेकर यांनी दिली.नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते फोवकांडा पिंपळ पार येथे कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांसह उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, जॉन नऱ्होना, सुबोध गावकर, बाबा मांजरेकर व अन्य नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग