शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डीएड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

By सुधीर राणे | Updated: November 27, 2023 16:10 IST

वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणे

कणकवली : केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर घेत असतो. यापूर्वीच आम्ही दोघांनीही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करणार असे जाहीर केलेले आहे. डीएड बेरोजगार त्यांना भेटायला आले होते, त्यामुळे त्यांनी मला भेटायला बोलावले. रत्नागिरीत तासिका तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली. तशी भरती प्रस्ताव तयार करुन अर्थ खात्याकडे पाठवून दिला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटुन बेरोजगारांच्या कामयस्वरुपी नोकरीबाबत विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भुषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, डीएड बेरोजगार सर्वांना नोकरी देण शक्य नाही. राज्यात २ लाख ४० हजार बेरोजगार आहेत. केवळ ३० हजार लोकांनाच नोकरी मिळू शकते. बाकींना नोकरी देणे कठीण आहे. यासाठी त्यांच्या गावातच थोड्या फार कमी खर्चात त्यांना मानधन तत्वावर नोकरी देण्याचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत ९ हजार रुपये मानधन तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली आहे. त्याच धरतीवर सिंधुदुर्गात भरती करता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.नारायण राणेंचे चांगले मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चांगले मार्गदर्शन करत असतात. जिल्ह्यामध्ये नवीन काय करायचे? हे आम्ही ठरवणार आहोत. राजकीय चर्चेपेक्षा मी राणेंना भेटत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र काम करणार हे आम्ही पुर्वी एकदा जाहीर केले होते. गणेशोत्सवात आम्ही भेटलो होतो. त्यामुळे तुम्ही ही राजकीय भेट समजण्याची गरज नाही. गैरसमज नको, माझ्या मनात मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल यापुर्वी जेवढा आदर होता तोच आदर कायम असल्याचेही केसरकरांनी सांगितले.  वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणेपक्ष वेगवेगळे असल्याने वैचारिक मतभेद होते. आमच्यात आता मतभेद कोणतेही नाहीत. हा डीएड विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यांना नोकरी मिळावी म्हणून मी मंत्री दीपक केसरकर यांना बोलावले होते. ज्या पध्द्तीने रत्नागिरीत डिएड बेरोजगारांना नोकरीत घेण्याचा  निर्णय झाला, तो निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावा यावर चर्चा झाली. केसरकर आणि राणेंमधील राजकीय संघर्ष हा केवळ एखाद्या मुद्द्यावर, विषयावरुन असेल. वैयक्तिक केव्हाही केला नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे