शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:32 IST

कुडाळ तालुक्यातील तुळसुली गौतमवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या नळपाणी योजनेचे काम ठेकेदार व तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे रेंगाळले आहे. येत्या आठ दिवसांत यावर यशस्वी तोडगा काढून समस्या मार्गी लावावी. अन्यथा १६ आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल, असा इशारा आदर्श युवा कला-क्रीडा मंडळ तुळसुली गौतमवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिला आहे.

ठळक मुद्दे तुळसुली गौतमवाडी येथील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना इशारा गौतमवाडीतील आदर्श युवा कला-क्रीडा मंडळ, ५० ग्रामस्थांचे निवेदनमंजूर नळपाणी योजना दोन वर्षांपासून रेंगाळलीठेकेदाराकडूनदेखील चालढकलपणा

सिंधुदुर्गनगरी, 28 : कुडाळ तालुक्यातील तुळसुली गौतमवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या नळपाणी योजनेचे काम ठेकेदार व तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे रेंगाळले आहे. येत्या आठ दिवसांत यावर यशस्वी तोडगा काढून समस्या मार्गी लावावी. अन्यथा १६ आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल, असा इशारा आदर्श युवा कला-क्रीडा मंडळ तुळसुली गौतमवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिला आहे.

जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गौतमवाडी  येथे मंजूर असलेली  नळपाणी योजना दोन वर्षांपासून रेंगाळत पडली आहे. याबाबत आपण तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. संबंधित ठेकेदाराकडूनदेखील चालढकलपणा केला जात आहे. 

या वाडीतील महिला व ग्रामस्थ गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणी व नळपाणी योजनेपासून वंचित आहेत. तब्बल एक किलोमीटर अंतरावरून विहिरीतील पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी या मंजूर असलेल्या व रखडलेल्या नळ पाणी योजनेची चौकशी करून  योग्य तो न्याय द्यावा.

अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार घालणार असल्याचा इशारा तुळसुली गौतमवाडीतील ५० ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना दिला आहे. या निवेदनावर योगेश्वर जाधव, निलेश जाधव, शाम जाधव, संतोष जाधव, शंकर जाधव यांची नावे आहेत.